चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने योगासन करणे लाभदायक असते. लहान मुलांपासून तर महिला, पुरुष यांनी नियमित योगासनचा अभ्यास करायला हवा. जसे की जास्त करून महिला दिवसभर कामांमुळे वेळ काढू शकत नाही. परिणाम असे होतात की मग लठ्ठपणा, रक्तचाप, शुगर, थायराइड आणि गुडघ्यांची समस्या निर्माण होते. महिलांसाठी हे काही योगासन आहेत जे महिलांसाठी लाभदायक आहे. चला जाणून घेऊ या.
बालासन-
या योगसेनाने शरीर कोमल बनते.या योगसनाच्या अभ्यासाने मानसिक शांती मिळते. आणि तणाव कमी होतो. बालासन करण्यासाठी जमिनीवर वज्रासन अवस्थामध्ये बसून श्वास आत घेऊन आपल्या दोघी हातांना डोक्याच्या वरती सरळ करा. आता श्वास बाहेर सोडतांना पुढे वाका आपल्या हाताच्या तळव्यांना आणि डोक्याला जमिनीवर टेकवत मोठा श्वास घ्या आणि सोडा. हाताच्या बोटांना एकत्रित जोडून डोक्याला दोन्ही हातामध्ये हळूच ठेवा काही वेळानंतर पूर्व स्थितीत या.
धनुरासन-
धनुरासन महिलांच्या मासिक धर्म संबंधी आजारांना दूर करते. या योगासनाने मांसपेशीं व्यवस्थित स्ट्रेचेबल होतात. ज्यामुळे पोटाची चर्बी कमी व्हायला मदत होते. धनुरासन करण्यासाठी पोटाच्या बाजूने झोपून गुडघ्यांमध्ये वाकवून घोट्यांना हाताने पकडावे आता आपले पाय आणि भुजांना आपल्या क्षमते प्रमाणे वरती करावे वरती पाहत काही वेळ याच मुद्रा मध्ये राहावे मग सामान्य अवस्थामध्ये येणे तसेच ही प्रक्रियेला परत करावी .
मलासन-
या योगासनाचा अभ्यास केल्याने पाय आणि मंड्यांची हाडे मजबूत होतात. तसेच पाय आणि मांड्या दुखत असतील तर आराम मिळतो. मलासनचा अभ्यास करण्यासाठी चटाई टाकून उभे रहाणे आता गुडग्यांना वाकवून हातांना नमस्कारच्या स्थितीत करून बसणे या दरम्यान गुडग्यांनमध्ये थोडे अंतर ठेवा.
सुखासन-
मानसिक आणि शारीरिक शांतिसाठी सुखासंचा अभ्यास हा उपयोगी आहे. या आसनला योगाची सुरवात करण्यापूर्वी केले जाते ज्यामुळे श्वास घेण्याची प्रक्रियावर नियंत्रण ठेवले जाऊ शकेल. या आसनला करण्यासाठी फर्शीवर पालथी मारून बसा आणि दोन्ही हातांना बंद करून हातांना गुडग्यावर ठेवा मग मोठा श्वास घ्या व ही प्रक्रिया परत करा.