घरात सर्वात जास्त जबाबदारी महिलांवर असते. महिला एक मुलगी, एक पत्नी, एक आई आणि सून म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असते. यात ती इतकी व्यस्त असते की स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. घर- ऑफिस, इतर काम हे सर्व बघता-बघता महिला स्वत:च्या आरोग्याबद्दल दुर्लक्ष करते. अशात सर्वात आधी महिला निरोगी असेल तर तिचं कुटुंब निरोगी राहू शकतं.
तरुणपणी सर्व झेपलं जातं परंतु जसं- जसं वय वाढतं त्रास उद्भवतात. वजन वाढणे, वेदना, आजार या समस्या समोर येऊ लागतात. अशात फिट रहाण्यासाठी सर्वात आवश्यक आहे योगासन करणे. येथे आम्ही तीन योगासनाबद्दल सांगत आहोत ज्याने आपण फीट राहू शकता आणि तारुण्य टिकवून एनर्जेटिक राहू शकता.
चक्रासन- चक्रासन केल्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.
1- याने चेस्ट विस्तार होतो आणि फुफ्फुसांना अधिक ऑक्सिजन मिळते.
2- चक्रासन केल्याने ताण कमी होण्यास मदत होते.
3- याने डोळ्यांसंबंधी त्रास दूर होतात.
4- याने पाठ आणि मसल्स मजबूत होते.
5- चक्रासन केल्याने थकवा दूर होतो आणि बॉडी डिटॉक्स होते.
6- चक्रासन केल्याने शरीर आणि मेंदूची सुस्ती गायब होते.
या प्रकारे करा चक्रासन
1- पाठीवर झोपा.
2- आता आपले पाय वळवा, आपले पाय फरशीवर ठेवा.
3- आता तळहात उलटून आपल्या कानाजवळ ठेवा.
4- जसे आपण श्वास घ्याल, आपल्या तळहात आणि पायांच्या सहाय्य हेतू ते जमिनीवर दाबा, आपले आर्म्स आणि पाय सरळ करुन शरीराला आर्च बनवण्यासाठी वरील बाजूस उचला.
5- आता हळू-हळू आपलं पूर्ण शरीर आर्च बनवण्यासाठी वरील बाजूस उचला.
6- आता डोकं हळूच मागील बाजूस ठेवा आणि आपल्या मानेला आराम द्या.
7- आपलं वजन आपल्या आंगमध्ये समान रूपात वितरित राखा.
हलासन- हलासन केल्याने पाठ, पाय आणि पोटाच्या सर्व भागांना आराम मिळतो. चला जाणून घेऊया हलासनाचे कोणते फायदे आहेत.
1- हलासन केल्याने पाठीच्या आणि मणक्याच्या स्नायूंना ताकद मिळते, कारण यामध्ये पाठ वाकलेली असते.
2- हे पाठीच्या मज्जातंतूंवर दबाव आणते आणि पाठीच्या मज्जातंतूंचे कार्य सुधारते.
3- हे रक्ताभिसरण वाढवते आणि पचनासाठी फायदेशीर ठरते.
4- यामुळे पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक होतो.
5- हे रक्तातील साखरेची पातळी सामान्य करते.
6- हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
या प्रकारे करा हलासन
1- सर्वप्रथम जमिनीवर चटई टाकून कमर सरळ ठेवून झोपा.
2- दोन्ही हात मांड्याजवळ जमिनीवर ठेवा.
3- आता श्वास घेताना दोन्ही पाय हळू हळू सरळ वर करा.
4- हात खाली दाबा आणि कंबर वाकवून पाय डोक्याच्या मागे ठेवा.
5- नंतर 2-3 मिनिटांनी डोके न वर करता हळू हळू सामान्य स्थितीत या.
अंजनेयासन- अंजनेयासन केल्याने वजन कमी होते तसेच इतर अनेक फायदेही मिळतात. जाणून घेऊया याचे काय फायदे आहेत.
1- अंजनेयासन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजनही कमी होते.
2- अंजनेयासन केल्याने रक्ताभिसरण अधिक चांगले होते.
3- असे केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
4- असे केल्याने शरीरावरील ताण बराच कमी होतो.
या प्रकारे करावे अंजनेयासन
1- सर्वप्रथम वज्रासनाच्या मुद्रेत बसा.
2- आता तुमचा डावा पाय मागे घ्या आणि उजव्या पायाचा तळवा जमिनीवर ठेवा.
3- दोन्ही हात डोक्याच्या वर घेऊन एकमेकांना जोडा.
4- हळू हळू मागे वाकण्याचा प्रयत्न करा.
5- या दरम्यान, शक्य तितके आपले हात मागे हलवा.
6- काही काळ या स्थितीत राहा आणि नंतर जुन्या स्थितीत या.