लोकांना असे वाटते की योग केल्यानं शरीर तंदुरुस्त राहतं पण आम्ही आपणास सांगू इच्छितो की योग आपल्या मनाला शांत करण्यासह नैराश्य आणि अस्वस्थतेला दूर करत.
योगा बद्दल असे नेहमीच म्हटलं जात की हे केल्यानं शरीर लवचिकं आणि बळकट बनतं पण योगापासून होणाऱ्या मानसिक फायद्याविषयी फारच कमी बोललं जात. योग असा उपाय आहे ज्याने बऱ्याच मानसिक आजारांना टाळता येऊ शकतं.
होय, जर आपण असा विचार करीत असाल की योग केल्यानं शरीराला निव्वळ तंदुरुस्त ठेवता येत, तर कदाचित आपण चूक असाल. कारण योगाच्या माध्यमाने नैराश्य आणि अस्वस्थते सह मनाला शांत करण्यासाठी एक उत्तम औषध मानलं जातं. आज या लेखात आम्ही आपल्याला काही असे योग बद्दल सांगत आहोत ज्यामुळे आपण नैराश्य उदासीनता, अस्वस्थता आणि मनाला शांत करू शकता.
1 सेतुबंधासन योग -
सेतुबंधासन योग करणं खूपच सोपं आहे. हा योगासन शरीरात रक्त परिसंचरण सुधारतं. त्यासह हे मेंदूचा ताण कमी करण्यात मदत करतं.
हे योगासन जर आपण नियमितपणाने दिवसातून 5 ते 10 मिनिटे करत असाल तर आपण औदासीन्य आणि अस्वस्थता या सारख्या समस्यांपासून दूर होऊ शकता. या योगा बद्दल असे बोलले जाते की हे केल्यानं मानेचं दुखणं देखील दूर होत आणि त्याच सह हे पचनास देखील योग्य असत.
2 उष्ट्रासन योग -
हा योग मनाला शांत करण्यासाठी तसेच ताण तणाव दूर करण्यासाठी सर्वोत्तम औषध मानलं जातं. असे म्हणतात की हे योग केल्यानं शरीरात ऑक्सिजनची कमतरता होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांसाठी या योगाला करणं फायदेशीर मानलं जातं. हे केल्यानं खांदा आणि पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळतं. राग शांत करण्यासाठी या योगाला उत्तम मानलं आहे. या योगाला दररोज किमान 5 ते 7 मिनिटे करा.
3 चक्रासन योग - हे योग आपल्याला अनेक त्रासांपासून दूर ठेवतं. जसे की मणक्याचे हाड किंवा पाठीचा कणा बळकट करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आणि छातीला रुंद करण्यासाठी याला योग्य योगासन मानतात. हे असे योगासन आहे जे आपल्याला ताण तणावा ला दूर करण्यास आणि मन शांत करण्यास आणि वृद्धत्व रोखण्यास मदत करतं.
4 पश्चिमोत्तानासन योग -
योग्य झोप न लागल्यामुळे तणाव आणि अस्वस्थता मन शांत न राहणं पण, पश्चिमोत्तानासन योग असे औषध आहे जे या सर्व त्रासांवरचे औषध आहे. जर आपण तणाव, अस्वस्थता आणि मन अशांत असल्याने त्रस्त आहात. तर या योगासनाला नियमित रूपाने किमान 5 ते 10 मिनिटे दर रोज करा. हे योग शरीरास लवचिकं बनवतं. पाठीच्या कणांच्या दुखण्याला देखील दूर करतं.