नवीन वर्षाच्या नव्या लहरी सुरु झाल्या आहेत अशात ज्योतिष 2023 जाणून घेण्याचा उत्साहही वाढू लागला आहे. प्रत्येकाला आपली कुंडली, भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता असते. 12 राशींसाठी नवीन वर्ष 2023 कसे असेल हे थोडक्यात जाणून घेऊया... वेबदुनिया आपल्या पुढील लेखांमध्ये तज्ञांद्वारे तपशीलवार वार्षिक अंदाज घेऊन येईल, परंतु येथे आपल्या नवीन वर्षाचे भविष्य अगदी सोप्या आणि संक्षिप्त पद्धतीने जाणून घ्या. ..
मेष : वर्ष 2023 मध्ये आपले स्वप्न केवळ पूर्णच होणार नाही तर लवकर लवकर पूर्ण होतील. जे मिळेल ते अधिकाधिक मिळेल, भरभरुन मिळेल. मंगळवारी गुळ-चण्याची डाळ दान करा.
वृषभ : 2023 मध्ये आनंद दार ठोठावेल. यशाचे नवे मार्ग खुले होतील. अंगणात वसंत फुलेल. शुक्रवारी मंदिरात पांढरा कापूस ठेवा.
मिथुन : 2023 हे वर्ष संमिश्र आहे, परंतु प्रगती होणार. वाद वाढतील, तणाव निर्माण होईल, पण त्यावर लगेच नियंत्रणही येईल. दर बुधवारी पोपटाला बाजरी खाऊ घाला.
कर्क : गाडी चालताना पुन्हा पुन्हा थांबत असेल तर या वर्षी चांगलाच वेग पकडेल. यश, समृद्धी आणि आदर स्वत: पुढे होऊन मिळेल. सोमवारी चांदी खरेदी करून आणा.
सिंह : नवीन वर्षात सितारे बुलंद असणार. हायपरटेंशनची समस्या होऊ शकते परंतु समाजात प्रसिद्धी वाढेल आणि लोभावर ताबा असावा. देवीच्या मंदिरा नारळावर अक्षता ठेवून अर्पित करा.
कन्या : वर्ष 2023 मध्ये वाहन खरेदी कराल आणि व्यवसायात नवीन बदल होतील. वाणीवर नियंत्रण ठेवा. वाद टाळल्या वर्ष भरभराटीचे जाईल. एखाद्या निरोगी वयस्कर महिलेला हिरवी साडी भेट म्हणून द्या.
तूळ : 2023 मध्ये तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुठीही रोखू शकत नाही जर तुम्ही तुमच्या व्यसनांवर आणि वाईट सवयींवर नियंत्रण ठेवता. रोमान्सचे तारे या वर्षी चमकत आहेत. कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दूध आणि साखरेची मिठाई अर्पण करून शिवाची पूजा करा.
वृश्चिक : 2023 मध्ये तुम्हाला नवीन घर मिळेल, प्रगती होईल, तुमच्या संघर्षाची गोड फळे तुम्हाला मिळतील. पण प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर खूप काळजी घ्या. 7 बदाम लाल कपड्यात बांधून मंगळवारी हनुमान मंदिरात अर्पण करा.
धनू: आपल्यासाठी नवीन घराचे योग घडतील. आरोग्याची गाडी रुळावर येईल. समस्या सुटतील. बगुलामुखी देवीला हळदीची गाठ अर्पित करा. मनोकामना पूर्ण होतील.
मकर : या वर्षी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता, कायदेशीर बाबींमध्ये चमकदार यश मिळेल. नात्यात गोडवा येईल. पैशाच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल चोपडून पोळी खायला द्या.
कुंभ : एक अद्भुत वर्ष तुमच्या पुढे आहे. तुम्हाला यश, प्रगती आणि इच्छित उंची मिळत राहतील. आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहा. शनिवार ते शनिवार असे सलग 8 दिवस काळ्या मुंग्यांना साखर आणि खोपरा बुरा खाऊ घाला.
मीन : आरोग्याची काळजी घ्या. संमिश्र सुख वर्षभर मिळत राहील. त्वचा आणि दात यासंबंधी त्रास उद्भवू शकतो. घरात संबंध सुधरतील. गणपती मंदिरात गुरुवार किंवा चतुर्थीला लाडवाचा प्रसाद दाखवा.