Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 15 May 2025
webdunia

अयोध्यातील रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात : संभाजी भिडे

Lord Ram idol
, मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (08:49 IST)
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अयोध्यामध्ये उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरातील मूर्तीमध्ये रामाला मिशा असाव्यात, अशी मागणी केली आहे. अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी होत आहे, या पार्श्वभूमीवर भिडे गुरुजी यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
 
त्यांच्याप्रमाणे आतापर्यंत शिल्पकार, चित्रकार यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्याला राम दाखवले. त्यांनी आपली मागणी मंदिर समितीमधील प्रमुख गोविंदगिरी यांच्याकडे केली आहे. त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत हे देखील म्हटले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निमंत्रण नसले तरी अयोध्याला जावे. 
 
तसेच महाभारत युध्दावेळी अर्जुनाची जी अवस्था झाली होती, तशीच अवस्था राममंदिर भूमिपूजनावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झाली असल्याचे ते म्हणाले. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने पवित्र सोहळ्याला विरोध करणे योग्य नाही असेही ते म्हणाले.
 
तसेच करोनामुळे नागरिकांनी न घाबरता राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त देशभर आनंदोत्सव घरोघरी साजरा करावा. घराघरात रामाच्या प्रतिमेचे पूजन व्हावे. आणि राम मंदिराचे भूमिपूजन हा गौरवाचा क्षण असून राष्ट्रीय सणाप्रमाणे सर्व हिंदूंनी हा उत्सव साजरा करावा आणि दिवाळी, दसऱ्याप्रमाणे या दिवशी फटाके वाजवावे असे आवाहनही भिडे यांनी केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jio चे दोन नवीन प्लॅन