Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत NCB ची कोठडी

आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत NCB ची कोठडी
, सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (18:25 IST)
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्जप्रकरणी कोर्टानं 7 ऑक्टोबरपर्यंत NCB ची कोठडी सुनावली आहे.
 
अरबाज आणि मुनमुन यांनाही 7 ऑक्टोबरपर्यंत NCB च्या कोठडीत राहावं लागणार आहे.
 
"आरोपीच्या फोन चॅटमध्ये कोड नावं आहेत. याची चौकशी करायची आहे. सत्य शोधण्यासाठी आम्हाला पोलीस कस्टडीची गरज आहे. आज आम्ही एका आरोपीला अटक केलीय. हे लोक एका ग्रुपमध्ये काम करतात. ड्रग्जचं सिंडिकेट शोधायचंय. ही एक गँग आहे, एकाकडून दुसऱ्याकडे जातात," असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं.
 
तर आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी म्हटलं की, "आर्यनच्या बॅगमध्ये काहीही मिळालं नाहीय. एनसीबीने त्याचा फोन घेतला. अरबाज मर्चंट हा आर्यनचा मित्र आहे. त्याच्याकडे 6 ग्रॅम चरस मिळाला. इतर आरोपींकडे ड्रग्ज मिळालं. त्या आरोपींना आर्यन ओळखत नाही. त्याचा त्यांच्याशी संबंध नाही."
 
इतर आरोपींकडून मिळालेल्या ड्रग्जवरून आर्यनची कोठडी मागत असल्याचं वकील सतीश मानेशिंदे म्हणाले.
 
आर्यन खानची कालची रात्र NCB कोठडीत
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आर्यन खानला NDPS act 8C, 20 B, 27 आणि 35 या कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे.
 
आर्यन खान बरोबरच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांनाही रविवारी (3 ऑक्टोबर) कोर्टात हजर करण्यात आलं.
 
पुढील चौकशीसाठी दोन दिवसांच्या NCB कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने आर्यन खानला एक दिवसाची कोठडी दिली.
 
आरोपींकडे 13 ग्राम कोकेन, 5 MD मेथाडोन, 21 ग्राम चरस, 22 एकस्टेसीच्या गोळ्या आणि 1.33 लाख रुपयांची रोख सापडली.
 
आरोपी आणि ड्रग्सच्या रॅकेटमधील संबंध शोधण्यासाठी कस्टडी हवी आहे अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
 
आर्यन खानच्या बॅगमध्ये तसेच फोनमध्ये काहीच सापडलं नाही तेव्हा आर्यन खानला जामिन देण्यात यावा अशी मागणी आर्यन खानचे वकील सतिश मानेशिंदेंनी केली. त्यांनी न्यायालयात जामिन याचिका दाखल केली होती.
 
नुपूर सतिजा, इश्मित सिंह चढ्ढा, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत छोकर या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनाही सोमवारी (4 ऑक्टोबर) कोर्टात हजर केलं जाणार आहे.
 
दरम्यान, दरम्यान, आर्यनवरील कारवाईनंतर रविवारी (3 ऑक्टोबर रात्री उशीरा अभिनेता सलमान खान हा शाहरूखची भेट घेण्यासाठी त्याच्या 'मन्नत' बंगल्यावर पोहोचला.
 
सलमानची गाडी पाहिल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला गराडा घातला, मात्र सलमान कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट आतमध्ये गेला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डेव्हिड ज्युलियस, अर्दम पटापुतियन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्याची घोषणा