Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कामाचा आठवडा चार दिवसांवर आणता येईल का?

Webdunia
शनिवार, 11 मे 2019 (10:39 IST)
भरपूर काम आणि कमी पगार अशी स्थिती असेल तर कर्मचारी आळशी होतात असं म्हटलं जातं.
 
पण जास्त काम आणि कमी पगारामुळे स्थितीमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमतासुद्धा कमी होते. ते दुखावले जातात का किंवा त्यांच्यावर ताण येतो असंही म्हटलं जातं. त्यामुळे कर्मचाऱ्यांचाही विचार होणं आवश्यक आहे म्हटलं जात आहे.
 
इंग्लंडच्या टीयूसी या कामगार संघटनेसारख्या अनेक संघटनांचं असंच म्हणणं आहे. त्यांच्यामते कामाचा आठवडा पाच दिवसांवरून चार दिवसांवर आणला पाहिजे.
 
सध्या मिळत असलेल्या वेतनातच कमी तास काम केलं पाहिजे आणि सुटीच्या दिवशी तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी आणि कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे अशी यामागची भूमिका आहे.
 
हे वास्तवात येणं फार चांगलं वाटत असलं तरी मागच्या वर्षी इंग्लंडच्या वेलकम ट्रस्टने चार दिवसांचा आठवडा करावा की नाही यावर मतं गोळा केली.
 
कामाचा आठवडा चार दिवसांचा केल्यावर, उत्पादनक्षमता आणि कर्मचाऱ्यांची स्थिती सुधारेल का तसेच सध्या हा ट्रस्ट करत असल्याच्या कामाच्या प्रभावावर काही परिणाम होणार नाही ना असे प्रश्न विचारल्याचे वेलकम ट्रस्टचे डायरेक्टर ऑफ पॉलिसी एड व्हीटिंग यांनी सांगितले.
 
या ट्रस्टने देशातील इतर कंपन्यांची माहितीही गोळा केली. अनेक लहान कंपन्यांनी याआधीच कामाचा आठवडा चार दिवसांवर आणला आहे. परंतु इतक्या मोठ्या, प्रसिद्ध तशाच ना नफा तत्वावर चालणाऱ्या संस्थेनं तोच निर्णय अंमलात आणणं इंग्लंडमध्ये लक्षवेधी ठरलं असतं.
वेलकम ट्रस्टने हा प्रस्ताव फेटाळला
याबाबत बोलताना व्हीटिंग सांगतात, याची अनेक कारणं होती. काही लोकांना हा बदल चांगला वाटला होता. आपण अधिक चांगले काम करू शकू आणि पाचव्या दिवसाचा उपयोग अधिक चांगल्या पद्धतीने करू शकू असं त्यांनी मत मांडलं होतं. तर काही कर्मचाऱ्यांनी संपूर्ण कामाचा भार चार दिवसांवर येईल असं सांगितलं. तसेच पार्ट टाइम काम करणाऱ्या लोकांनाही आपल्या मुलांची काळजी घेणं किंवा इतर कामांकडे दुर्लक्ष होईल असं वाटलं.
 
तसेच चार दिवसांचा आठवड्यात भरपूर ऊर्जा खर्च करण्यामुळे संस्थेच्या धर्मादायाच्या मूळ कामाकडे दुर्लक्ष होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
 
या लोकांच्या म्हणण्याबाबत व्हीटिंग यांनी सांगितले, हीच कार्यक्षमता आपण पाच दिवसांमध्ये वाढवू शकत नाही का असा प्रश्न या लोकांनी विचारला.
 
शेवटी जागतिक पातळीवरचे प्रश्न सोडवणे, संशोधनाला निधी देणे यासारख्या संस्थेच्या कामांवर या बदलामुळे परिणाम होईल असे वाटल्याने आम्ही हा निर्णय घेतला नाही. तुम्ही एकत्रितरित्या कामाचा उपयोग कसा करता आणि संस्थेत कसं काम करता त्यावर सगळं अवलंबून आहे.
 
खर्चात कपात
 
चार दिवसांचा आठवडा केल्यामुळे कामाचा ताण कमी होतो, कामाशी संबंधित आजार कमी होतात, उत्पादन क्षमता वाढते असे म्हणणाऱ्या लोकांसाठी वेलकम ट्रस्टचा निर्णय एक चपराकच आहे.
 
ग्लासगोस्थित पर्सुएट मार्केटिंग कंपनीने तीन वर्षांपूर्वीच चार दिवसांचा आठवडा केला आणि पैसे न कापता कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सुटी द्यायला सुरूवात केली.
 
पर्सुएट मार्केटिंगचे लॉरेन ग्रे म्हणाले, सुरुवातीला आम्ही हा मुद्दा काढला तेव्हा आमच्या फायनान्स डायरेक्टरने त्यास पगारखर्च असेच पाहाण्याचे ठरवले. नंतर मात्र उत्पादकता वाढल्याचे दिसून आले. उत्पादकतेत ३० टक्क्यांनी वाढ झाली. कर्मचाऱ्यांनी आजारपणाच्या रजा घेण्याचं प्रमाण कमी झालं. नवे कर्मचारी घेण्यासाठी कंपनीला आता सारखं प्रोफेशनल रिक्रूटर्सना पैसे द्यावे लागत नाही. कारण आता त्यांच्या कंपनीत काम करण्यासाठी भरपूर लोक इच्छुक आहेत.
 
पण अजूनही इतर देशांमध्ये याचे परिणाम मिश्र स्वरूपाचे असल्याचे दिसून आले. न्यूझीलंडच्या पर्पेच्युअल गार्डियन या इस्टेट मॅनेजमेंट कंपनीने चार दिवसांचा आठवडा करून पाहिला. त्यांच्या उत्पादनक्षमतेत कोणतीही घट झाली नाही.
 
स्वीडनच्या गोथेनबर्ग इथल्या सरकारी नर्सिंग होमने कामाची वेळ सहा तासांवर आणून पाहिली. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढली आणि आजारपणाच्या सुट्याचं प्रमाण कमी झालं पण उरलेल्या वेळेत काम करण्यासाठी नवे कर्मचारी भरती करावे लागले. त्यानंतर हा प्रयोग बंदच करण्यात आला.
दुहेरी कर्मचारी व्यवस्था
रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे डायरेक्टर ऑफ इकॉनॉमी असणाऱ्या अशीम सिंग यांच्यामते आरोग्यक्षेत्राच्या तुलनेत मार्केटिंग आणि फायनान्स क्षेत्रामध्ये चार दिवसांचा आठवडा करणे सोपे आहे. जर काही क्षेत्रांमध्ये कामाचे तास कमी झाले तर काम करणाऱ्यांमध्ये दोन प्रकारच्या फळ्या तयार होतील.
 
चार दिवसांच्या आठवड्यात काम करणारे व्हाईट कॉलर कर्मचारी आणि दुसऱ्या फळीत पाच दिवसांत कमी महत्त्वाचे वाटणारे काम करणारे लोक असे तयार होईल.
 
हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घ्यायला हवा असं ते म्हणतात. परंतु आपल्या समाजात आणि अर्थव्यवस्थेत कुटुंबाला अधिक स्थान देण्याचा पर्याय निवडण्याइतपत मोठा राजकीय निर्णय घेण्यासाठी आपण तयार आहोत का हा प्रश्न आहे.
 
चार दिवसांच्या आठवड्याऐवजी आपल्या 800 कर्मचाऱ्यांसाठी दुसरा कोणता तरी लवचिक पर्याय निवडण्याचा निर्णय वेलकम ट्रस्टने घेतला आहे. तर पर्सुएट मार्केटिंगने चार दिवसांचा आठवडा केल्यावर कधी मागं वळून पाहिलंच नाही असं सांगितलं आहे.

मॅन्युएला सारागोसा,

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments