Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'फडणवीसांना टरबुज्या, अन् मला चंपा म्हणता ते चालतं का?' - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil
, सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (12:55 IST)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं.
 
"मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?" असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
शरद पवार यांच्यावरील टीकेबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरीही व्यक्त केली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
 
"राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो," अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी काल एका मेळाव्यात टीका केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली-महाराष्ट्र आणि गुजरातमधील कोरोनामुळे परिस्थिती अधिकच बिघडली, सरकारांनी स्टेटस रिपोर्ट द्यावा : सर्वोच्च न्यायालय