Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना नागपूर: 31 मार्चपर्यंत निर्बंध कायम - नितीन राऊत

Corona Nagpur: Restrictions up till March 31 - Nitin Raut
, शनिवार, 20 मार्च 2021 (17:49 IST)
नागपुरात 31 मार्च पर्यंत कडक निर्बंध कायम राहतील अशी माहिती नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूर येथे दिली.
कोरोना संदर्भात आज नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सर्वपक्षीय बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. यात काही नियम शिथिल करण्यात आले आहेत.
अत्यावश्यक सेवा वगळता पूर्वी 1 वाजेपर्यंत हे निर्बंध होते ते आता 4 वाजेपर्यंत करण्यात आलेले आहेत. भाजीपाला, फळे, किराणा दुकानं आता 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
"राज्यातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण नागपूर जिल्ह्यात सापडताहेत. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेले बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलो आहे. जर लॅाकडाऊन हा एकमेव उपाय असेल किंवा परिणामकारक असेल तर आम्ही चर्चा करु. लॉकडाऊनला टोकाचा विरोध नाही", असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू झाला आहे. 18 मार्च 2021 रोजी शहरात 2 हजार 913 रुग्ण म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालीय.
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 21 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे एकाच दिवसात 14 जणांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली.
 
कठोर लॉकडाऊन नको, लसीकरणाला वेग द्या: देवेंद्र फडणवीस
'कठोर लॉकडाऊनला आता सारेच कंटाळले आहेत. त्यामुळे गरिबांचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे कुठे रूग्णसंख्या वाढीमुळे आवश्यकता भासलीच तर निर्बंधयुक्त लॉकडाऊन करायला हवा, पण, कठोर लॉकडाऊन नको. शिवाय, आता लसीकरणाला वेग द्यायला हवा', अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे व्यक्त केली.
 
कोरोनाची ही दुसरी लाट आहे का?
सध्या नागपूर जिल्ह्यात कोरानाची दुसरी लाट सुरू झाली आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी बीबीसी मराठीला सांगितले, "कोरानाच्या पहिल्या लाटेत जी अवस्था झाली ती पाहता दुसऱ्या लाटेचे नाव घेतले तरी अंगावर काटा उभा राहतो. पण या दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधिक रुग्णांचा मृत्यूदर हा 1.14 एवढा आहे."
"गेल्या वर्षीच्या ऑगस्ट मध्ये हा मृत्युदर 3.82 तर सप्टेंबर हा मृत्यूदर 3.21 एवढा होता. लोकांमध्ये कोरोनाविरोधातील रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने मृत्युदर कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मृत्यूदर कमी असण्याला उपचारादरम्यान आलेले अनुभव कामी येत आहे," असं डॉ. गावंडे सांगतात.
 
कोरानाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी प्रशासन तयार आहे का?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात प्रशासन सज्ज आहे का या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. गावंडे सांगतात, "शासकीय रुग्णालयातील बेड्सची संख्या वाढवली जात आहे. आता जरी कोरोनाच्या पेशंटची संख्या वाढत असली तरी नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढली असल्याने मोठ्या प्रमाणात पेशंट घरीच विलगीकरण उपचार घेत आहेत."

नागपूर शहरातील आरोग्य व्यवस्थेची सध्या काय स्थिती आहे ?
शासकीय रुग्णालयांमधील एकुण बेड्सची स्थिती - 1550
आयसीयू बेड्स- 319
ऑक्सिजन बेड्स- 1177
व्हेंटिलेटर - 270

खाजगी रुग्णालयांमधील एकूण बेड्सची स्थिती 1313
आयसीयू बेड्स - 832
ऑक्सिजन बेड्स - 1423
व्हेंटिलेटर - 214
कोरोना चाचण्यांची काय स्थिती काय ?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर्स शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 15 हजार नागरिकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे.
कोरोनाबाधितांचा संख्या 1700 च्या वर गेल्यावर जिल्हा प्रशासनाने नागपूर शहरात 15 मार्च ते 21 मार्च पर्यंत कर्फ्युसह कडक लॉकडाऊन लावले आहे. महानगर पालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे.
"जे नागरिक विनाकारण फिरताना दिसतात त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याची शिक्षा देण्यात येईल," असे नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बीबीसी मराठीला सांगितले.
"शहरातील सर्व सीमांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरातील आतही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे," असं अमितेश कुमार यांनी सांगितले.
नागपूर शहरात आता आठड्याभऱ्याच्या लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - रुग्णालय, मेयो, एम्स आणि महानगर पालिकेच्या दवाखान्यांसह खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोनाचे लसीकरण सुरू आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना व्हायरस : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोव्हिड पॉझिटिव्ह