Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

भारत-न्यूझीलंड सेमीफायनल पावसामुळे आजही रद्द झाली तर?

भारत-न्यूझीलंड सेमीफायनल पावसामुळे आजही रद्द झाली तर?
पावसाचा जोर वाढत गेल्याने भारत-न्यूझीलंड मॅच आज खेळवण्यात येईल. मंगळवारी ज्या स्थितीत मॅच थांबली होती तिथूनच खेळ पुढे सुरू करण्यात येईल. काल न्यूझीलंडने 46.1 ओव्हरमध्ये 211/5 अशी मजल मारली होती. रॉस टेलर 67 तर टॉम लॅथम 3 धावांवर खेळत आहेत.
 
याआधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पण एकंदरच न्यूझीलंडचा रनरेट अत्यंत संथ आहे.
 
पावसाचा जोर कायम असल्याने अनेक शक्यता चर्चिल्या जात होत्या. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्याने अंपायर्सनी खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
 
आज काय होणार?
 
जर आजही पाऊस पडला ओव्हर कमी होऊन आणि न्यूझीलंड पुढे बॅटिंग करू शकला नाही तर त्याल डकवर्थ लुईस नियमांच्या आधारावर भारताचं लक्ष्य निर्धारित होईल.
 
डकवर्थ लुईस नियमाचा आधार घ्यायचा झाल्यास भारताला 20 ओव्हरमध्ये 148 रन्स कराव्या लागतील. 25 ओव्हरमध्ये हे टार्गेट 172 रन, 30 ओव्हरमध्ये 192., 35 ओव्हरमध्ये 209 आणि 40 ओव्हरमध्ये 223 असेल. तर 46 ओव्हरमध्ये 237 रन्स भारताला कराव्या लागतील.
 
आज खेळ रद्द करावा लागला तर...
 
आज पावसामुळे खेळ रद्द करावा लागला तर प्राथमिक फेरीत गुणतालिकेत सर्वाधिक गुण असणाऱ्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. प्राथमिक फेरीअखेर टीम इंडियाचे 15 तर न्यूझीलंडचे 11 गुण झाले आहेत. पावसाचा जोर कायम राहिला आणि मॅच रद्दच झाली तर टीम इंडियाला विजयी घोषित करण्यात येईल.
 
दरम्यान आतापर्यंतच्या डावात कर्णधार विल्यमसनने संयमी आणि चिवट अर्धशतकी खेळी केली. अर्धशतकानंतर रनरेट वाढवण्यासाठी आक्रमक झालेल्या केनला युझवेंद्र चहलने बाद केलं. त्याने 6 चौकारांसह 67 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
 
रॉस टेलरने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या बळावर न्यूझीलंडने दोनशेचा टप्पा ओलांडला.
 
बुमराहने भन्नाट फॉर्म कायम राखत मार्टिन गप्तीलला माघारी धाडलं. टप्पा पडून ऑफस्टंपवर मारा करणाऱ्या बुमराहच्या चेंडूवर गप्तीलने कोहलीने सुरेख कॅच घेतला. गप्तीलने एका धावेची भर घातली.
 
गप्तील बाद झाल्यानंतर केन विल्यमसन आणि हेन्री निकोल्स यांनी सावधपणे खेळ करत डाव सावरला. पॉवरप्लेच्या 10 ओव्हरमध्ये न्यूझीलंडने फक्त 27 धावा केल्या.
 
दरम्यान रवींद्र जडेजाने हेन्री निकोल्सला बाद करत ही जोडी फोडली. निकोल्सने 51 चेंडूत 28 धावा केल्या.
 
टीम इंडियात बदल
टीम इंडियाने या मॅचसाठी कुलदीप यादवऐवजी युझवेंद्र चहलचा समावेश केला आहे. दरम्यान भुवनेश्वर कुमारऐवजी मोहम्मद शमीचा समावेश होईल अशी चिन्हं होती मात्र टीम इंडियाने भुवनेश्वरवरच विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने टीम साऊदीऐवजी लॉकी फर्ग्युसनचा समावेश केला.
 
चौथ्या ओव्हरनंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला. उपचारांसाठी हार्दिक पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडिया पाच गोलंदाजांसह खेळत असल्याने हार्दिक फिट असणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं आहे.
 
प्राथमिक फेरीअखेर भारतीय संघ गुणतालिकेत 15 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारताने 9 पैकी 7 सामने जिंकले असून, इंग्लंडविरुद्धचा सामना त्यांनी गमावला होता तर न्यूझीलंडविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली होती.
 
दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत 11 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. न्यूझीलंडने 9 पैकी 5 सामने जिंकले असून 3 सामने गमावले आहेत.
 
आजवर या दोन संघांत 8 वर्ल्ड कप सामने झाले असून, न्यूझीलंडने 4 तर भारतीय संघाने 3 सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द झाला होता.
 
फायनलमध्येही पाऊस आला तर
फायनलमध्ये पाऊस आला तर काय हा प्रश्नही इथे महत्त्वाचा आहे. कारण त्यापुढे कोणतीच फेरी नाही. जर फायनलमध्ये पाऊस आला तर दोन्ही संघांना विजेता घोषित केलं जाईल. ही परिस्थिती आतापर्यंत कधीही उपस्थित झालेली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांच्या 'त्या' व्हीडिओमुळे पाकिस्तानचं राजकारण तापलं