Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फडणवीस यांना मुख्यमंत्री करा, तीन महिन्यात मराठा आरक्षण मिळवून देऊ- नितेश राणे - नितेश राणे

Make Devendra Fadnavis Chief Minister
, मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (15:06 IST)
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा आणि तीन महिन्यात मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची असा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.  
 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. पण अद्याप यासंदर्भात कोणताही अंतिम निकाल आलेला नाही.
 
इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. पण या सरकारची इच्छाशक्ती नाही असा आरोपही नितेश राणे यांनी केलाय. ते सिंधुदुर्गात बोलत होते.
 
भाजपचे खासदार उदयनराजे यांनीही नुकतीच मराठा आक्षणावरून सरकारवर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा आरक्षण टिकले होते असंही उदयनराजे म्हणाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली शेतकरी आंदोलन: पंजाबमधील शेतकरी आंदोलनातील हे आहेत प्रमुख नेते