Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॅन्सरसाठी वनौषधी घेताय, एकदा डॉक्टरला विचाराच

Webdunia
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (16:08 IST)
कॅन्सरचे पेशंट जर त्यांच्या आजारासाठी काही वनौषधी घेत असतील किंवा घरगुती उपचार करत असतील तर त्यांनी आपल्या डॉक्टर्सला ताबडतोब सांगायला हवं. कारण ही घरगुती औषधं कॅन्सरच्या उपचारांचे बारा वाजवू शकतात.
 
उदाहरणार्थ आलं, लसुण, जिन्को नावाच्या चीनमध्ये सापडणाऱ्या औषधांपासून बनणाऱ्या हर्बल गोळ्या यांसारख्या गोष्टी ब्रेस्ट कॅन्सरमुळे झालेल्या त्वचेवरच्या जखमांना बरं होण्यापासून रोखू शकतात.
 
युकेमध्ये कॅन्सरवर झालेल्या तज्ज्ञांच्या परिसंवादात ही बाब समोर आली आहे.
 
सर्जन मारिया जोआओ कार्डोसो यांनी नमूद केलं की हर्बल औषधोपचारांनी किंवा मलमांनी कॅन्सर बरा करण्यात हातभार लागू शकतो हे सिद्ध झालेलं नाही.
 
'जेव्हा व्दिधा मनस्थिती असेल तेव्हा तर ही औषध न घेतलेलीच बरी'
 
"डॉक्टरांनी आपले पेशंट औषधांव्यतिरिक्त काही थेरेपी घेत आहेत का ते स्वतःहून विचारायला हवं. खासकरून अॅडव्हान्स स्टेजच्या कॅन्सरची ट्रीटमेंट देताना," पोर्तुगालमधल्या लिस्बनमध्ये चॅम्पालिमंड कॅन्सर सेंटरमध्ये मुख्य ब्रेस्ट सर्जन असणाऱ्या कार्डोसो यांनी बीबीसीला सांगितलं.
 
त्वचेपर्यंत पोहोचलेल्या कॅन्सरसाठी इतर पुरक उपचार घेताना आपल्या डॉक्टरांशी बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे असंही त्यांनी नमूद केलं.
 
दर पाच पैकी एक ब्रेस्ट कॅन्सर त्वचेतही पसरतो. इतर प्रकारचे कॅन्सर त्वचेत पसरण्याची शक्यता कमी असते.
 
हर्बल थेरपीत वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी किमोथेरपीमध्ये अडचणीच्या ठरू शकतात. तसंच त्याने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो, त्यामुळे त्वचेवर झालेल्या जखमा उशीरा बऱ्या होतात.
 
इसबगोल, ताप उतरवणाऱ्या जडीबुटी, लसुण, आलं, जिन्को, जिनसेंग, नागफणी, हॉर्स चेस्टनट (एका विशिष्ट प्रकारचा शिंगाडा), हळद यासारख्या हर्बल गोष्टी कॅन्सर उपचारांसाठी मारक ठरू शकतात असं त्याचं म्हणणं आहे.
 
'अजून नुकसान करू नका'
 
अनेकदा कॅन्सर पेंशट आपल्या आजारासाठी किमोथेरपीबरोबरच पूरक उपचार पद्धती शोधत असतात. त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतींनी वापरल्याने पेशंटचं अजूनच नुकसान होणार नाही ना.
 
"आरोग्याच्या क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे : अजून नुकसान करू नका," कार्डोसो म्हणाल्या.
 
कॅन्सर रिसर्च यूकेच्या वेबसाईटवर स्पष्ट म्हटलंय की अशा पर्यायी उपचार पद्धतींनी अॅलोपथीची औषधं काम करेनाशी होतात.
 
त्यात असंही म्हटलंय की काही पेयं, अन्नपदार्थ आणि अगदी ग्रेपफ्रुट तसंच संत्र्यांसारखी काही फळं कॅन्सरवरील उपचार सुरू असताना टाळले पाहिजेत. यामुळे कॅन्सरच्या औषधांचं शरीरात व्यवस्थित विघटन होत नाही.
 
यूकेमधल्या चॅरिटी ब्रेस्ट कॅन्सर हॉस्पिटलमधल्या क्लीनिकल स्पेशालिस्ट नर्स ग्रेट ब्राऊटन-स्मिथ म्हणाल्या की, "ऑनलाईन मिळणाऱ्या अशा पर्यायी औषधोपचारांविषयी खूप काही लिहिलेलं असतं पण त्यातलं किती खरं किती खोटं कोणास ठाऊक. त्यामुळे आपल्या डॉक्टरशी मनमोकळेपणाने बोलणं, आपण काय उपचार घेतोय ते सांगणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती घेणं फायद्याचं ठरू शकतं."
 
पण योग, चांगली मनस्थिती, रेकी, अॅक्युपंक्चर यासारख्या थेरपींचा पेंशटला फायदा होऊ शकतो असंही कार्डोसो सांगतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments