Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असाल तर घ्या काळजी!

travel in plane
, शुक्रवार, 1 जून 2018 (09:02 IST)
उन्हाळ्यात अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, परिवारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. कुणी आपल्या शहराच्या आजूबाजूला जाऊन एन्जॉय करतात तर काही दूर जातात. अनेकजण पहिल्यांदाच विमानाने प्रवास करण्याचाही प्लॅन करतात. पण पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार्‍यांची वेळेवर वेगवेगळ्या कारणांनी पंचाईत होत असते. पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार्‍यांमध्ये मोठी उत्सुकता आणि आनंद असतो. पण या आनंदात काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते. चला जाणून घेऊया पहिल्यांदा विमानाने प्रवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
 
दोन तास आधी एअरपोर्टला पोहोचा
 
जर तुम्ही पहिल्यांदाच विमान प्रवास करत असाल तर तुमचे एअरपोर्टवर कमीत कमी 2 तास आधी पोहोचणे गरजेचे आहे. याचं कारण म्हणजे एअरपोर्टवरील सर्वच प्रोसेस फार वेळखाऊ असतात. त्या पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे आधीच तेथे पोहोचल्यास अधिक चांगले.
 
आयडी प्रूफ आणि तिकिटाची फोटोकॉपी
 
पहिल्यांदाच विमान प्रवास करणार असाल तर तुमचं तिकीट आणि ओळखपत्राची फोटोकॉपी अवश्य ठेवा. जर तुम्ही तुमच्या परिवारासोबत आणि मुलांसोबत प्रवास करत असाल तर त्यांचा जन्माचा दाखला आणि परिवारातील सदस्यांचे ओळखपत्र सोबत ठेवा.
 
एअरलाईनच्या हिशेबाने ठेवा बॅग
 
एअरलाईन्सचे वेगळे नियम असतात. त्यानुसार काही नियोजित वजनाची बॅग तुम्ही विमानात घेऊन जाऊ शकता. त्यामुळे नियमानुसार बॅगेचं वजन ठेवा, अन्यथा तुम्हाला जास्तवजनासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. यासोबतच बॅगेमध्ये टोकदार वस्तू, चाकू किंवा ब्लेडसारख्या वस्तू ठेवू नका.
 
सिक्युरिटी चेकिंगला द्या प्रतिसाद
 
तुम्हाला चेकिंग काऊंटरवर बोर्डिंग पास आणि आयकार्ड दाखवावं लागेल. नंतर सिक्युरिटी फोर्स मेंबर्स तुमचं चेकिंग करणार आणि बोर्डिंग पासवर स्टॅम्प तुम्हाला परत देतील. यात उगाच दिरंगाई करु नका. त्यानंतर तुम्हाला सांगण्यात आलेल्या गेटकडे जावं लागेल. तुमचा फ्लाईट नंबर आणि सीट नंबरही तुम्हाला दिला जाईल.
 
सीट बेल्ट आणि इतर माहिती नीट ऐका
 
टेकऑफच्या एक तासांपूर्वी टर्मिनलचं गेट उघडलं जाईल. इथे पुन्हा एकदा बोर्डिंग पास आणि हँडबॅग चेक करावं लागेल. प्लेनमध्ये एन्ट्री केल्यानंतर सर्वातआधी क्रू मेंबर्स तुम्हाला काही सूचना देतील. त्या फॉलो करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या टॉप क्रिकेटरला डेट करत आहे बॉलीवूड एक्ट्रेस निधि अग्रवाल