India Tourism : २०१९ मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना एक खास भेट दिली होती. या दिवशी त्यांनी केवळ भारतीय महिला पर्यटकांनाच नव्हे तर परदेशी महिला पर्यटकांनाही भारतातील ऐतिहासिक स्मारकांमध्ये मोफत प्रवेश दिला आहे. तेव्हापासून, दरवर्षी महिला आठ मार्च रोजी कोणत्याही शुल्काशिवाय भारतातील कोणत्याही स्मारकाला भेट देऊ शकतात.
ताजमहाल-
जर तुम्ही ताजमहाल पाह्यचा असेल तर २०० रुपये खर्च करण्याची गरज नाही. ताजमहालमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला ५० रुपये द्यावे लागतात. जर तुम्हाला ताजमहालचा मुख्य मकबरा आतून आणि वरून पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला २०० रुपये वेगळे द्यावे लागतील. पण महिलांना ते पाहण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. ही ठिकाणे महिलांसाठी अगदी सुरक्षित आहे.
लाल किल्ला-
सोमवार ते शुक्रवार लाल किल्ल्याचे प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती ६० रुपये आहे. याशिवाय, शनिवार आणि रविवारी ८० रुपये शुल्क आकारले जाते. पण येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.
कुतुबमिनार-
भारतीयांसाठी कुतुबमिनारमध्ये प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती ३५ ते ४० रुपये आहे. याशिवाय परदेशी लोकांकडून ५०० रुपये घेतले जातात. पण आंतरराष्ट्रीय महिला दिनी कुतुबमिनारमध्ये प्रवेश सर्व महिलांसाठी मोफत आहे. त्याचप्रमाणे, अशी अनेक स्मारके आहे जिथे महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रवेश शुल्क भरावे लागत नाही.