Marathi Biodata Maker
✕

अभिनेता अक्षय कुमारच्या बहिणीची फसवणूक करणाऱ्या मनसे नेत्याला अटक

Webdunia
शनिवार, 3 ऑक्टोबर 2026 (14:52 IST)
बॉलिवूड क्षेत्रातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याची बहीण अलका भाटिया यांच्या कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या पवई पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख गणेश चुक्कल यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.
ALSO READ: प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणात १० वर्षांनंतर मोठा निर्णय, मुंबई उच्च न्यायालयाने राहुल राज सिंगला दोषमुक्त केले
मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमार याची बहीण अलका भाटिया या संचालिका असलेल्या 'मेलरोनिया हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या पवई येथील हिरानंदानी इस्टेटमधील 'ओडोनियो' इमारतीतील फ्लॅट क्र. ३५०५ संदर्भात हा वाद आहे. गणेश चुक्कल यांनी अलका भाटिया आणि कंपनीच्या इतर संचालकांची बनावट सही करून ३० वर्षांचा बोगस लीज करार तयार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये चुक्कल यांच्या 'ब्राइस इन्फ्रास्ट्रक्चर' कंपनीने हा फ्लॅट ३६ महिन्यांसाठी भाड्याने घेतला होता. परंतु, भाडे देणे बंद झाल्यानंतर आणि करार संपुष्टात आल्यावर, त्यांनी मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून ३ वर्षांची लीज थेट ३० वर्षे दाखवणारा बनावट दस्तऐवज तयार केला. कंपनीच्या तक्रारीवरून २०२२ मध्ये पवई पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि खंडणी मागणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी अखेर गणेश चुक्कल आणि त्यांचा सहकारी समीर सावंत या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ALSO READ: मुंबई EOW ने अभिनेता दिनो मोरियाला अटक केली! मिठी नदी ड्रेनेज स्कॅम प्रकरणात मोठा धक्का

Related News

सर्व पहा

नक्की वाचा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

नवीन

कार्तिक आर्यनची नवी प्रेमकथा ३० एप्रिलला प्रदर्शित होणार

"भक्तांच्या सर्व चिंता दूर करून मनोकामना पूर्ण करणारी चिंतपूर्णी देवी", ५१ शक्तिपीठांपैकी एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ

आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस, अभिनेत्याने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला

Jailer 2 Movie Review 'जेलर २' मध्ये रजनीकांत यांचा पुन्हा धुमाकूळ; पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा!

आमिर खानचा पुतण्या अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस; देश सोडण्याचे अल्टीमेटम

पुढील लेख
Show comments