Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आर्यनला जामीन मिळाल्याने शाहरुख खानने घेतली वकीलांची भेट

After Aryan got bail
, शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (08:24 IST)
पुत्र आर्यन खानला तब्बल २५ दिवसांनंतर जामीन मिळाल्याने अभिनेता शाहरुख खानचा जीव भांड्यात पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत आर्यन खानसह त्याच्या दोन मित्रांना जामीन मंजूर केला आहे. यासाठी शाहरुखने तीन दिग्गज वकीलांची फौज न्यायालयात उभी केली होती. त्यात ज्येष्ठ अॅड विधीज्ञ मुकुल रोहतगी, अॅड अमित देसाई, अॅड सतीश मानशिंदे यांनी भक्कम युक्तीवाद केला. त्यामुळेच आर्यनला जामीन मंजूर झाला आहे. याची दखल घेत अभिनेता शाहरुखने तातडीने वकीलांची भेट घेतली. या सर्वांचे त्याने आभार मानले. या विधीज्ञांमुळेच आर्यनची दिवाळी तुरुंगाऐवजी घरात साजरी होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेता रजनीकांत यांची प्रकृती खालावली, चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल