Festival Posters

आलिया भट खवळली..

Webdunia
गुरूवार, 23 जानेवारी 2020 (14:42 IST)
आलिया भट 'गंगूबाई काठिावाडी'च्या सेटवर जखमी झाल्याचे वृत्तसोशल मीडिावर व्हारल झाले आणि चाहते काळजीत पडले. खरे तर ही बातमी आलियाच्या एका पोस्टमुळेच व्हायरल झाली होती. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मांजरीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. 'मम्मीसोबत सेल्फी टाईम. कारण पाठीला दुखापत झाली आहे. अशात रात्री दोन वाजता यापेक्षा चांगले करण्यासारखे काय आहे?,' असे तिने या फोटोसोबत लिहिले होते. आलियाची ही पोस्ट वाचूनच 'गंगूबाई काठियावाडी'च्या सेटवर आलिया जखीमी झाल्याचे वृत्त पसरले होते. पण या वृत्तामुळे आलिया चांगलीच खवळल्याचे दिसते. हो, एक लांबलचक पोस्ट लिहून आलियाने याबद्दलचा संताप बोलून दाखवला आहे. मला 'गंगूबाई काठिावाडी'च्या सेटवर कुठलीही दुखापत झालेली नाही. हे वृत्त खोटे आहे. जुने दुखणे होते, त्यामुळे मला त्रास होत होता. यापुढे माझ्यासोबत काय झाले, यावर छापण्यापूर्वी कृपया माझ्याकडून एकदा कन्फर्म करण्याची तसदी घ्या. असल्या खोट्या बातम्या छापण्यापूर्वी माझ्याकडून कन्फर्म करा, असे रागारागात आलियाने लिहिले. गेल्या काही दिवसांपासून कामातून ब्रेक घेऊन आराम करत होते आणि आता पुन्हा कामावर परतत आहे.

आजपासून 'गंगूबाई काठिावाडी'चे शूटिंग सुरु करणार असल्याचेही तिने सांगितले. आलिया भट सध्या 'गंगूबाई काठिावाडी'मुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे दोन पोस्टर्स नुकतेच रिलीज झाले आणि या पोस्टरनंतर आलियाच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. येत्या दिवसात आलिाचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

नवीन

आलिया भट्टच्या 'अल्फा'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, बॉबी देओल एका धोकादायक मार्गदर्शकाच्या भूमिकेत

रीना, किरण आणि गौरी एकत्र एकाच गाडीत; आमिर खानच्या 'मॉडर्न फॅमिली'चा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या!

यशराज फिल्म्सच्या धमाकेदार पॉपकॉर्न, अ‍ॅक्शन एंटरटेनर ‘ऐल्फा ’मध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी दिसणार ‘ऐल्फा’ अवतारात!

नसांच्या आजाराशी झुंज देणारा सोनू निगम, एमआरआय आणि सीटी स्कॅन सुरू असतानाही थेट सादरीकरण करणार

करण जोहर मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे; पृथ्वीराज सुकुमारनच्या 'ओडियन'ची घोषणा

पुढील लेख
Show comments