Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुमोना चक्रवर्तीच्या वडिलांना मारहाण

Webdunia
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (17:10 IST)

कॉमेडियन कपिल शर्मा शोची ऑनस्क्रिन पत्नी सुमोना चक्रवर्तीच्या वडिलांना मारहाण झाली आहे.  मुंबईत सुमोनाच्या वडिलांवर एका रिक्षा चालकाने हात उचलला. या मारहाणीत त्यांना दुखापत झाली असून डोक्याला जबर मार लागला आहे.  याप्रकरणी  पवई पोलीस ठाण्यात अमित गुप्ता या रिक्षा चालकावर कलम ३२४, ३३७, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.

सुमोनाने दिलेल्या माहितीप्रमाणे, मी आणि माझं कुटुंबीय अंधेरीत सेवन हिल्स रुग्णालयाच्या शेजारी राहतो. माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती. माझे वडील आईला रुग्णालयात घेऊन जात होते. एकही रिक्षावाला रुग्णालयापर्यंत जाण्यास तयार नव्हता. खूप वेळानंतर एका रिक्षा थांबली पण आमची अडचण पाहून त्याने जास्त पैसे मागितले. माझ्या बाबांनी ते देण्यास नकार दिला.  रागावलेल्या रिक्षावाल्याने तिच्या वडिलांच्या डोक्यात दगड घातला. त्याने बाबांना अनेक मुक्के मारले आणि धक्का दिला. दगड लागल्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. माझ्या आईने एक वाहनाला थांबवून त्यात वडिलांना रुग्णालयात नेले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हे असेच एक नाव आहे ज्यांनी प्रसिद्धीसाठी २० वर्षे केला संघर्ष

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

पाकिस्तान की नरक निवडण्याचा पर्यायावर जावेद अख्तर यांनी कोणता पर्याय निवडतील सांगितले

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची गळफास लावून आत्महत्या

पुढील लेख
Show comments