Dharma Sangrah

भूमी तख्तबाबत उत्साही आणि नाराजही

Webdunia
करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणार्‍या तख्तमध्ये काम करणारी भूमी पेडणेकर या सिनेमाबद्दल थोडी उत्साही आणि थोडी नर्व्हसही आहे. या ऐतिहासिक सिनेमातील कामाबाबत अजून आपले मत पूर्ण तयार झाले नसल्याचे तीम्हणाली. तख्तमध्ये करिना कपूर खान, रणवीर सिंह, आलिया भट, विकी कौशल, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर असणार आहेत. या सगळ्यांना एक कलाकार म्हणून भूमी मानते. या सगळ्यांबरोबर कामाचा अनुभवही खूप चांगला आहे. करण जोहरची तर ती चांगली फॅन आहे. मात्र ऐतिहासिक विषयाचे दडपण तिच्यावर आले आहे. अजून या विषयाला अनुकूल मनोभूमिका तयार करू न शकल्यामुळे थोडे नर्व्हस व्हायला झाल्याचेही तिने सांगितले. नुकत्याच रिलीज झालेल्या लस्ट स्टोरीजमधील कामाबद्दल भूमीचे खूप कौतुक होते आहे. चांगले रोल आणि चांगले सिनेमे मिळत असल्यामुळे ती खुशीत आहे. आतापर्यंत ज्या कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली, त्यांच्याबद्दल तिच्या मनात कृतज्ञतेचेही भाव आहेत. केवळ तीन वर्षात तिला तीन हिट सिनेमे मिळाले आहेत. भविष्यातल्या सिनेमांबाबत तिला खूप अपेक्षा आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

नवीन

'कॉकटेल २' च्या प्रदर्शनानंतर रश्मिका मंदाना भावुक झाली, 'दिया रेड्डी'ला निरोप दिला

भारतातील ५ सर्वात सुंदर पावसाळी रेल्वे ट्रॅक, जिथे दिसतात प्रत्येक वळणावर चित्तथरारक दृश्ये

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू तिच्या दुसऱ्या लग्नानंतर आई होणार

ए.आर. रहमान यांचे गाणे दिवंगत गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली देणार, टीझर प्रदर्शित

मातृत्व, संघर्ष आणि प्रतिकाराची अंगावर शहारे आणणारी कथा सांगणारा ‘मर्दिनी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

पुढील लेख
Show comments