Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाहिरातीवरून सोनम अभय यांच्यात शाब्दिक चकमक

bollywood/a fair battle sonam kapoor

अभयने देओलने कोणत्याही एका कलाकारावर निशाणा न साधता फेअरनेस क्रिमच्या जाहिराती देणाऱ्या कलाकारांच्या जाहिरांतीचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये एक फोटो सोनम कपूरचा देखील असल्याने तिने याला उत्तर देण्याचे ठरवले.

सोनमने अभयची चुलत बहीण ईशा देओलचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ईशा एका फेअरनेस ब्रॅण्डची जाहिरात करताना दिसते. सोनमने तो फोटो ट्विट करत लिहिले, ‘अभय मी यावर तुझं मत जाणू इच्छिते.’ सोनमच्या या ट्विटला उत्तर देताना, ‘हे ही चुकीचेच आहे,’ असं अभय म्हणाला. ‘माझी मतं जाणून घेण्यासाठी माझी पोस्ट वाच,’ असेही त्याने सोनमला सांगितले. तिने पुढे लिहिले, ‘ही जाहिरात मी १० वर्षांपूर्वी केली होती. तेव्हा मला याचे परिणाम माहित नव्हते. हे सगळ्यांसमोर आणण्यासाठी तुझे आभार.’ याला उत्तर देताना अभयने लिहिले की, ‘तू अधिक प्रतिभाशाली हो आणि तुला मिळालेल्या ताकदीचा योग्य वापर कर.’ 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

“सचिन: अ बिलियन ड्रीम्स” चे ट्रेलर रिलीज