Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इब्राहिमची बॉलिवूडमध्ये एण्ट्री

Ibrahim
Webdunia
बुधवार, 7 एप्रिल 2021 (14:38 IST)
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक रणवीर सिंग आहे. रणवीर सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे निर्माता करण जोहरने त्याच्या ‘तख्त' या चित्रपटाचा प्रोजेक्ट पुढे ढकलला आहे. ‘तख्त' या चित्रपटात रणवीरसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री आलिया भट्ट आहे. रणवीर आणि आलियाची जोडी पहिल्यांदा ‘गल्ली बॉय' चित्रपटामध्ये एकत्र दिसली होती. या दोघांचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता पुन्हा एकदा आलिया आणि रणवीरची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानकडे लागले आहे. इब्राहिम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इब्राहिम या चित्रपटात केवळ सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. त्याला फक्त चित्रपट निर्मितीची प्रक्रिया शिकायची आहे. त्याला लाँच करण्याची अद्याप कोणतीही योजना नाही. तो आता त्याचे शिक्षण पूर्ण करत आहे. इब्राहिमला अभिनेता व्हायचे आहे, पण त्याआधी त्याचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. त्यामुळे तो इतक्यात डेब्यू करणार नाही. 
 
करण जोहरचे ‘धर्मा प्रोडक्शन' हा रॉम-कॉम चित्रपट तयार करणार आहे. करण स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. इब्राहिम अली खान या चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. आलिया भट्ट लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 30 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, रणवीर सिंग ‘83' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 1983 च्या वर्ल्डकपवर आधारीत आहे. यात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

'हाऊसफुल ५' हा नाना पाटेकर यांचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला, आतापर्यंतच्या कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले!

राज ठाकरेंसोबतच्या अफेअरच्या बातम्यांवर सोनाली बेंद्रेने मौन सोडले, म्हणाली-खरोखरच .....

या पॉपगायिका बद्दल बादशाहने केली वादग्रस्त वक्तव्य,नेटकऱ्यांने ट्रोल केले

कॉमेडियन कपिल शर्मा यशाच्या शिखरावर; ओटीटीचा सर्वात महागडा विनोदी कलाकार बनला

विक्रांत मॅसीच्या आँखों की गुस्ताखियां' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला

सर्व पहा

नवीन

मिका सिंग एकेकाळी प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीचा धाकटा भाऊ म्हणून ओळखला जात होता

हनुमानजींनी जिथे तुलसीदासजींना दर्शन दिले; Sankat Mochan Hanuman Temple Varanasi

रणबीर-आलियाचा नवीन आलिशान बंगला तयार, लवकरच गृहप्रवेश करणार

बिग बॉस ओटीटी 3 ची विजेती सना मकबुल रुग्णालयात दाखल

बॉलिवूडची फॅशन आयकॉन मानल्या जाणाऱ्या सोनम कपूरचा प्रवास अनेकांसाठी आहे प्रेरणादायी

पुढील लेख
Show comments