Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकता कपूर विरुद्ध FIR दाखल करणारे आर्मी ऑफिसर संदीप चपराना यांच्याशी वेबदुनियाने साधला संवाद

रूना आशीष
सोमवार, 8 जून 2020 (12:45 IST)
एकता कपूर ने आपल्या वेबसीरिज 'xxx2' मधून ते दृश्य काढून टाकले आहे ज्यावर मागील काही दिवसांपासून वाद निर्माण झाला होता. 
 
यात दाखवण्यात आले होते की जेव्हा एक फौजी आपल्या ड्यूटीवर गेलेला असतो तेव्हा त्याची बायको आपल्या प्रियकराला घरी बोलावते आणि आपल्या पतीची युनिफॉर्म घालण्यासाठी देते. नंतर दोघांमध्ये फिजिकल इंटिमेसी सीन्स दाखवण्या आले होते. दरम्यान ती राष्ट्रीय प्रतीक सिंहाच्या तीन मुरत्या असलेला युनिफॉर्म फाडते. आर्मीशी निगडित लोकांनी यावर नराजगी जाहीर केली होती.
 
वेबदुनिया संवाददाता रूना आशीष यांनी संवाद साधला आर्मी ऑफिसर संदीप चपराना यांच्यासोबत ज्यांनी या प्रकरणात पुढे येऊन एकता कपूर विरुद्ध FIR दाखल केली. त्यांचा एक वीडियो देखील खूप व्हायरल होत आहे ज्यात ते एकता कपूरच्या या वेबसीरिजबद्दल सांगत आहे.
 
आपल्याला याबद्दल कुठून माहिती मिळाली? 
मी सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनेक लोकांचे मेसेज येतात. मला माझ्या एका फॉलोअरने मेसेज पाठवला ज्यात याबद्दल सांगण्यात आले होते. मी ती सीरीज बघितली आणि तो सीन बघून तर हैराण झालो. मला विश्वासच बसत नव्हता की मी काय बघत आहे.
 
तेव्हा आपण काय केले?
मला खूप वाईट वाटलं की ज्या वर्दीला आम्ही इतका सन्मान देतो, आमची शान आहे आमचा युनिफॉर्म आणि ते सगळं बघताना राग येऊ लागला की मी विडिओ तयार करून अपलोड केला. मला वाईट वाटत होते पण बघता-बघता विडिओ व्हायरल झाला. 
 
नंतर मला वाटलं की पोलिसात तक्रार दाखल करावी. एक जून रोजी मी पोलिसात तक्रार केली ज्यात एकता कपूर, शोभा कपूर यांच्या व्यतिरिक्त त्याचे लेखक आणि  कलाकारांविरुद्ध देखील एफआयआर दाखल केली आहे. नंतर कळले की मुंबईत बिग बॉसमध्ये सामील झालेले हिंदुस्तानी भाऊ नावाच्या व्यक्तीने देखील तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर माझ्याबद्दल चर्चा केली मी माझ्याकडून प्रेरित होऊन ते पोलिसांकडे धाव घेत आहे. 
 
आपला विडिओ व्हायरल झाला पण आपल्या सोशल मीडियावर का दिसत नाहीये? तसेच आणखी दोन विडिओ देखील दिसत नाहीये?
जेव्हा मी वेबसीरिजचे सीन्स ‍बघितले तेव्हा मला वाईट वाटले आणि मी विडिओ अपलोड केले. माझ्या हृदयातून त्या गोष्टी निघाल्या परंतू नंतर वाटलं की मला अजून विचार करायला हवा होता. आर्मीमध्ये काही प्रोटोकॉल असतात जे निभावणे माझे कर्तव्य आहे आणि त्या व्हायरल विडिओमध्ये असणार्‍या गोष्टी मी देशप्रेमात बोललो होतो. विडिओ बनवताना सारखं वाटतं होतं की आम्ही ज्या युनिफॉर्मची शपथ घेतो त्याचा अपमान कसा काय सहन करावा? परंतू मला आपल्या सीनियर्सचा सन्मान करायचा आहे म्हणूनच मी या विचाराने विडिओ काढून घेतला. 
 
आपण आता कुठे काम करत आहात? त्याबद्दल सांगा
मी पूर्णपणे माहिती देऊ शकत नाही, परंतू इतकं सांगू शकतो की मी फरीदाबादच्या जवळपासच्या भागात आहेत. मी ऑफिसर्स ट्रेनिंग एकेडेमी चेन्नई येथील पास आऊट असून नंतर एनसीसीमध्ये असोसिएट एनसीसी ऑफिसर आहे. मी तरुणांसोबत काम करतो. हे तरुण देशाचे भविष्य आहे. काही काळापूर्वी मी दरवर्षी होणार्‍या राज्याच्या गणतंत्र दिवस कँप समितीमध्ये देखील होता. (प्री आरडीसी). मी लाइन एरिया आणि फ्लॅग एरियामध्ये विशेष करून लक्ष घातले आहे.
 
आपण तरुणांसोबत काम करताना अशी घटना घडल्यावर असे वाटतं का की आता ओटीटी प्लेटफॉर्मसाठी सेंसर बोर्ड असावं?
मी आपल्या विडिओत तेच म्हटले आहे की आमच्या देशात असे अनेक कायदे आहे जे ब्रिटिशकालीन आहे. नवीन कायदे तयार व्हावे आणि जुन्या कायद्यांमध्ये बदल व्हावे परंतू यासाठी लोकांच्या आतून आवाज येण्याची गरज आहे. चांगल्या लोकांनी राजकारणात येण्याची गरज आहे. शिक्षित लोकांनी यात येऊन कायदा तयार करावे, त्यांना लागू करावे नाहीतर अशा प्रकाराच्या शोजवर ताबा ठेवणे कठीण होईल. हे लोकं मामा-मामी, काका-काकू आणि वाटेल ते प्रकाराचे संबंध दाखवतात. आज एखादा 14 वर्षाचा मुलगा हे सर्व बघितल्यावर त्याला खरं समजेल. यानंतर काय ते मुलं आपल्या नातलगांना सन्मानाने बघतील? या प्रकारेच शो आमच्या नवीन पिढीसाठी एखाद्या व्यसनाप्रमाणे काम करत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

'द ग्रेट इंडियन कपिल शो' वादात अडकला,कायदेशीर नोटीस मिळाली

अद्भुत असा चंदेरी किल्ला

बिग बॉस 18 च्या घरात हिंसाचार,दोन स्पर्धकांमध्ये जोरदार हाणामारी

सलमान खानला धमकीचे मेसेज पाठवल्या प्रकरणी गीतकाराला अटक

'महावतार' चित्रपटात विकी कौशल चिरंजीवी परशुरामच्या भूमिकेत,चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार

पुढील लेख
Show comments