Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काळ्या हरणाची पूजा बिश्नोई समाज करतो हे सलमान खानला माहीत नव्हते, एक्स गर्लफ्रेंड सोमी अली म्हणाली- लॉरेन्सची माफी मागणार

Webdunia
सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (13:13 IST)
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. अलीकडेच लॉरेन्स गँगने सलमानचे जवळचे मित्र राष्ट्रवादी नेता बाबा सिद्दीकी यांचीही हत्या केली. तेव्हापासून सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार काळवीट प्रकरण हे लॉरेन्स बिश्नोईच्या सलमान खानसोबतच्या शत्रुत्वाचे  कारण मानले जाते. तसेच 1998 मध्ये सलमान खान 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगसाठी जोधपूरमध्ये गेले होते. यावेळी काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानसह चित्रपटातील इतर स्टार्सची नावे देखील समोर आली होती.
 
बिश्नोई समाज काळ्या हरणाला देव मानतो. लॉरेन्स हा देखील बिश्नोई समाजाचा आहे. व सलमान खानला सततच्या धमक्या मिळत असताना, त्यांची एक्स मैत्रीण सोमी अलीने दावा केला आहे की, सलमानला काळवीटाची पूजा केली जाते हे माहित नव्हते, बिश्नोई समाजासाठी हरण पूजनीय आहे. असे सलमान खानला माहिती न्हवते. 
 
मिळालेल्या माहितीनुसार सोमी अली म्हणाली की, ज्या गोष्टीबद्दल त्याला माहितीही नाही त्याबद्दल सलमान माफी का मागणार? याला काही तर्क नाही. तसेच आज माझा त्याच्याशी किंवा त्याच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. तसेच सोमी म्हणाली, जेव्हा सलमानला हे माहित नव्हते की बिश्नोई समाजात काळ्या हरणाची पूजा केली जाते. तसेच मला बिश्नोई यांच्याशी बोलायचे आहे कारण हे घडले तेव्हा ते 5 वर्षांचे होते. त्याला स्पष्टीकरण द्यावे लागेल. हे तुम्ही कोणत्याही मुलाच्या मनात घातल की सलमानने तुमच्या देवाला मारले तर त्याला काय समजेल. तो आता 33 वर्षांचा आहे. त्याला बसून समजावून सांगावे लागेल. समलानं काही केलं नसताना माफी का मागायची.
 
सोमी म्हणाली की, जेव्हा मी नोव्हेंबरमध्ये सुट्टीवर भारतात येईन तेव्हा मला बिश्नोई टोळीचा लीडर  देवेंद्रशी बोलायला आवडेल. मी सलमानचे नाव घेऊन लॉरेन्सची माफी मागणार आहे. बिश्नोई समाजाकडून काळ्या हरणाची पूजा केली जाते हे मला माहीत नव्हते, असे सलमानने सांगितले आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप

बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया

‘वॉर 2’ चा टीझर प्रदर्शित; ऋतिक रोशन आणि एनटीआर च्या टक्करने वाढवली उत्सुकता!

अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री तमन्ना भाटियाला कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडची ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यावरून वाद

'सन ऑफ सरदार' फेम अभिनेते मुकुल देव यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

प्रसिद्ध छायाचित्रकार-अभिनेत्याचे वयाच्या 53 व्या वर्षी निधन

घुसखोरीच्या प्रयत्नानंतर सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा वाढवली

Shani Temples चमत्कारी सहा मंदिर जिथे शनिदेव प्रत्यक्ष उपस्थित असतात

पुढील लेख
Show comments