Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमिताभच्या चित्रपटाची निर्मिती करणार शाहरूख खान

shahruh amitabh get together
, गुरूवार, 21 जून 2018 (10:46 IST)
आगामी 'झिरो' चित्रपटाचा टिझरमुळे चर्चेत असलेला किंग खान अर्थात शाहरूख खान हा सुजॉय घोष याच्या 'बदला' चित्रपटासाठी निर्माता म्हणून काम करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शाहरूख खानसोबत सुनील खेत्रपालही करणार आहे. विशेष म्हणजे यात अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू ही जोडी काम करणार आहे. यापूर्वी ही जोडी 'पिंक' चित्रपटात झळकली होती. याबाबत सुजॉय घोष म्हणाले की, जर तुमच्या चित्रपटात अमिताभ बच्चन सारखे कलाकार काम करत असल्यास तुम्हीच तिथेच अर्धी लढाई जिंकल्यात जमा आहे. कारण प्रत्येक डायरेक्टर त्यांच्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक आहेत. मीही त्यांच्यासोबत काम करण्यासाठी खूपच उत्साही आहे. त्यातच आता शाहरूख खानही निर्माता म्हणून काम करणार असल्याने माझा उत्साह आणखी वाढला आहे. या चित्रपटाचे कथानक अशा दोघांवर आधारित आहे, जे एकेमेकांचा बदला घेऊ इच्छित असतात. मात्र, जेव्हा बदला घेण्याची वेळ येते तेव्हा दोघांचे बदला घेण्याचे मायने बदललेले असतात. या चित्रपटात दुसर्‍या व्यक्तीची भूमिका नसीरुद्दीन शहा साकारण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दोन दिग्गज कलाकारांमधील जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळेल. दरम्यान, सुजॉय घोष आणि अमिताभ बच्चन यांनी 2009मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अलादीन' या चित्रपटात एकत्रित काम केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जीवन खूप सुंदर आहे