बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. गौरी एक आंतरराष्ट्रीय इंटिरियर आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. गौरी खानचा जन्म 8 ऑक्टोबर 1970 रोजी मुंबईत झाला. गौरी खान आज तिचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. गौरीने 25 ऑक्टोबर 1991 रोजी शाहरुख खानसोबत लग्न केले. पत्नी असण्यासोबतच गौरी खान एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे.
आज गौरी खान रेड चिलीज एंटरटेनमेंटची सह-मालक देखील आहे. गौरी खानने 2004 मध्ये 'मैं हूं ना'ची निर्मिती केली होती. या चित्रपटात शाहरुख खान आणि सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत दिसले होते. गौरीने 2012 मध्ये इंटेरिअर डिझायनर म्हणून करिअरला सुरुवात केली. गौरी आणि शाहरुख हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. या बॉलिवूड पॉवर कपलच्या प्रेमापासून लग्नापर्यंतच्या रोमांचक आणि आव्हानात्मक प्रवासाच्या अनेक कहाण्या आहेत.
शाहरुख आणि गौरीची प्रेमकहाणी
शाहरुख आणि गौरीच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर प्रेम ते लग्नापर्यंतच्या त्यांच्या रोमांचक आणि आव्हानात्मक प्रवासाच्या अनेक कहाण्या आहेत. शाहरुख आणि गौरी दोघेही शालेय जीवनापासून एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केले आणि शेवटी दोघांनी आपल्या घरच्यांना सांगितले.
शाहरुख खानने हिंदू असल्याची बतावणी केली
शाहरुख मुस्लिम होता आणि गौरी हिंदू होती, त्यामुळे गौरीच्या कुटुंबीयांना हे नाते मान्य नव्हते. दोघांचे एकमेकांवर इतके प्रेम होते की गौरीच्या आई-वडिलांना प्रभावित करण्यासाठी शाहरुखने पाच वर्षे हिंदू असल्याचे भासवले. शाहरुख गौरीसाठी खूप पझेसिव्ह होता. इतकं की त्याला गौरी इतर कोणाशी बोलणंही पसंत करत नव्हतं. शाहरुखने गौरीला केस उघडे ठेवण्यास नेहमीच मनाई केली.
शाहरुख आणि गौरीचे लग्न
एक वेळ अशी आली की गौरी या सगळ्या गोष्टींना कंटाळली होती. त्यानंतर गौरीनेही त्याच्यासोबत ब्रेकअप केले पण नंतर शाहरुखने तिला समजवण्यासाठी मुंबई गाठली. मग गौरीने 25 ऑक्टोबर 1991 रोजी शाहरुखसोबत लग्न केले. आज या जोडप्याला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुले आहेत.