अभिनेत्री जान्हवी कपूरचा चित्रपट गुड लक जेरी' खूपच चर्चेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग पंजाबमध्ये होत आहे. पण आता या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा एकदा शेतकर्यांनी थांबवल्याचे समोर आले आहे. शेतकरी आंदोलनातील एक गट पटियालामध्ये शूटिंग होणार्याग सेटवर पोहोचला.
ज्यानंतर तिथे शेतकर्यांनी हंगामा केला. यावेळी चित्रपटाच्या शूटिंगविरोधात घोषणाबाजी केली आणि नंतर हॉटेलच्या बाहेरदेखील घोषणाबाजी केली. अभिनेत्री जान्हवी कपूर हिने हॉटेलमधून बाहेर यावे आणि कृषी कायद्याविरोधात आपला विरोध दर्शवावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली.
चित्रपटातील कलाकारांनी कृषी कायद्या विरोधातील आंदोलनाला समर्थन करावे, अशी शेतकर्यांची इच्छा होती. फक्त जान्हवी कपूर नाही तर इतर बॉलिवूड कलाकारांनी पण शेतकर्यांसाठी समर्थन करण्याकरता पुढे यावे. दरम्यान जान्हवीच्या गुड लक जेरी' चित्रपटाचे शूटिंग थांबवणे, हे दुसर्यां दा घडले आहे. यापूर्वी 11 जानेवारीला शेतकर्यांचा एका गट फतेहगढ साहिब जवळील बस्सी पठाणमध्ये शूटिंगच्या ठिकाणी पोहोचला होता. अभिनेत्रीने कृषी कायद्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले होते.