Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशाचा सगळ्यात लाडका डान्स शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 5’ परत येत आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

super dance5
, सोमवार, 26 मे 2025 (12:48 IST)
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध डान्स रियालिटी शो सुपर डान्सर आपला पाचवा सीझन घेऊन परत येत आहे. या नव्या सीझनमध्ये असामान्य प्रतिभा असलेले 12 छोटे डान्सर्स असतील. 12 कोरिओग्राफर्सनी या 12 स्पर्धकांची त्यांच्या प्रतिभेने प्रभावित होऊन निवड केली आहे.

या प्रत्येक स्पर्धकासोबत एक गुरु असेल, जो या उभरत्या प्रतिभांना असामान्य कलाकार बनण्यासाठी मार्गदर्शन करेल. पण सुपर डान्सर चॅप्टर 5 ची गंमत इथेच संपत नाही. हा शो फक्त डान्सविषयी नसून स्पर्धक आणि त्यांची पहिली गुरु, त्यांची आई यांच्यातील प्रेमाचा तो गौरव करेल. या प्रत्येक सुपरस्टार मुलाच्या मागे असलेल्या प्रेमाचा आणि बलिदानाचा तो शोध घेईल.
 
उत्साही बॉलीवूड सुंदरी शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि सदैव प्रसन्न असणारी गीता कपूर (गीता मा) परीक्षकांच्या रूपात या शोमध्ये जिवंतपणा आणतील आणि यावेळी त्यांच्यासोबत परीक्षकांच्या पॅनलमध्ये आहे प्रसिद्ध कोरिओग्राफर मर्झी पेस्तनजी. हे तिघे मिळून प्रत्येक स्पर्धकाच्या परफॉर्मन्समध्ये जीव, गंमत आणि प्रामाणिकपणा आणण्याचा प्रयत्न करतील. आपल्या अनोख्या आणि रंजक शैलीबद्दल ओळखला जाणारा परितोष त्रिपाठी नव्या सीझनचे सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज आहे.
 
या शोविषयी बोलताना शिल्पा शेट्टी म्हणते, “आपल्या मुलाने नाव काढावे असे प्रत्येक आईला वाटत असते. मी स्वतः आई असल्यामुळे एक आई आपल्या मुलाला किती निरपेक्ष प्रेम आणि आधार देते हे मी जाणते. एक परीक्षक म्हणून मी नेहमी डान्सचा प्रभाव कसा आहे हे बघत असते. त्यामुळे त्यातील तांत्रिक बाजूबरोबरच माझ्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या परफॉर्मन्सच्या शोधात मी असते. नवीन सीझनबद्दल मी खूप उत्साही आहे आणि सगळे सुपरस्टार आणि त्यांच्या असामान्य मातांना भेटण्यास उत्सुक आहे.”
 
या शोविषयी गीता कपूर म्हणते, “एक आई आणि तिच्या मुलामधील मंगल नात्यास अधोरेखित करून या सीझनने एक पुढचे पाऊल टाकले आहे. सोशल मीडियावर आधीच खूप चाहते असलेले स्पर्धक या मंचावर अस्सलतेची चुणूक दाखवतील, आपल्यातली निडर प्रयोगशीलता आणि आपली कल्पना जबरदस्त परफॉर्मन्समध्ये रूपांतरित करण्याची वचनबद्धता दाखवतील. या सगळ्या प्रतिभावान आणि लोकप्रिय स्पर्धकांना भेटण्यास मी उत्सुक आहे.”
 
या शोविषयी बोलताना मर्झी पेस्तनजी म्हणतो, “या पूर्वी ‘सुपर डान्सर’मध्ये अतिथी परीक्षक म्हणून येण्याचे भाग्य मला लाभले आहे. आणि प्रत्येक वेळी, या मुलांमधील जबरदस्त प्रतिभा, त्यांची अदम्य ऊर्जा आणि त्यांनी घेतलेला ध्यास पाहून मी अचंबित झालो आहे. यावेळी पहिल्यांदाच मी या शो मध्ये परीक्षक म्हणून येत आहे. त्यामुळे मला छान वाटते आहे आणि मी थोडा भावुक देखील झालो आहे.”
 
सुपर डान्सर सीझन 5 लवकरच येत आहे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रीती झिंटाने आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनला 1.10 कोटी रुपये दान केले