Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सारा आणि कार्तिकच्या रिलेशनशिपबद्दल पुन्हा चर्चा

Talk about the relationship between Sarah and Karthik again
, शनिवार, 22 जून 2019 (15:44 IST)
अभिनेता कार्तिक आर्यन हा अभिनेत्री सारा अली खानच्या घरी पोहचल्याने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं जात आहे. त्यामुळे सारा आणि कार्तिक हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. अनेक फॅन्सला त्यांच्या रिलेशनशिपबद्दल उत्सुकता लागली आहे. मात्र दोघेही सध्या गुपचूपपणे भेटत आहेत. कार्तिक आणि सारा अली खान पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. कार्तिकला साराच्या फ्लॅटमधून निघताना पाहिलं गेलं आहे. या फोटोमध्ये सारा कार्तिक बरोबर दिसत आहे. पण ही जोडी सध्या बॉलिवूड विश्वात चर्चेत आहे. या आधी ईदच्या दिवशीही सारा आणि कार्तिक एकत्र दिसले होते. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्यात जवळीकता वाढत असल्याने अमृता सिंग नाराज  आहेत. सारा आणि कार्तिक यांच्यातील नातं त्यांना पटलेलं नाही. रिपोर्टनुसार साराच्या प्रोफेशनल लाइफचा पर्सनल लाइफवर परिणाम होत आहे. सारा आणि कार्तिक आर्यन बॉलिवूडमध्ये सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. मात्र साराच्या आईने तिला तिच्या करिअरकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

"कसंतरी होतंय"