बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान नेहमी हटके भूमिका करताना दिसतो. चित्रपटातील भूमिका खास ठरावी यासाठी या अभिनेत्याला एका अवतारातून दुसर्या अवतारात शिरताना सगळ्यांनीच पाहिले आहे. त्यासाठी कधी त्याने पगडीबरोबर लांब दाढी धारण केली तर कधी खुल्या केसांबरोबर दाढी, कधी क्रू कट लूक तर कधी आणखी काही. आता आपला आगामी चित्रपट लाल सिंग चढ्ढासाठी देखील तो असेच काहीतरी हटके प्रयोग करताना दिसून येणार आहे. लाल सिंगचड्ढा या चित्रपटासाठी लांब दाढी ठेवल्यानंतर आता तो अलीकडेच क्लीन शेव लूकमध्ये दिसून आला. आता तो पंजाबमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. आमिरच्या सरदारच्या लूकबरोबरच त्याच्या लांब दाढीतील लूकचीही प्रशंसा होत आहे.
लाल सिंग चड्ढा हा सिनमे फॉरेस्ट गम्प या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात आणीबाणीपासून, कारगिल युद्ध, पुलवामा हल्ला, उरी हल्ला, तेव्हापासून आतार्पंत बदललेली अनेक सरकारं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात आमिरसोबत करिना कपूरसुद्धा दिसणार आहेत.