Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

26 जुलैच्या पुराची 15 वर्ष: अभिनेता ऋतिक रोशन एका मुलीचे प्राण वाचवून बनला खऱ्या आयुष्यातील सुपरहीरो! चाहत्यांनी जागवल्या आठवणी

26 जुलैच्या पुराची 15 वर्ष: अभिनेता ऋतिक रोशन एका मुलीचे प्राण वाचवून बनला खऱ्या आयुष्यातील सुपरहीरो! चाहत्यांनी जागवल्या आठवणी
, मंगळवार, 28 जुलै 2020 (18:25 IST)
या वर्षी 26 जुलैला, मुंबईत आलेल्या महाभयंकर पुरला 15 वर्ष झाली असली तरीही मुंबईकरांच्या मनात त्या महाभयंकर पुराचा अनुभव अजूनही ताजा आहे. असाच एक अनुभव एका ट्विटर वापरकर्ता, निशांत कौशिक याने शेअर केला, ज्यामध्ये ऑनस्क्रीन सुपर हीरो ऋतिक रोशन याच्या बाबत होता. त्याने सांगितले की त्या दिवशी आपला मित्र अभिनेता अभिषेक बच्चन याच्या बंगला, प्रतिक्षाबाहेर एका मुलीचे प्राण वाचवले होते.
 
या घटनेविषयी त्याने लिहिले की, “डीन ने आमच्यापैकी काहींना या मुलींना एनएमआयएमएस (NMIMS) मधून त्यांच्या जुहू हॉस्टेलवर सोडण्यास सांगितले होते. हॉस्टेलपासून केवळ दहा फीट अंतरावर, एका मुलीचा हात आमच्या मानवी साखळीतून सुटला आणि ती पाण्याखाली गेली. ऋतिकने प्रतीक्षा बंगल्यातून बाहेर येऊन तिला वाचवले. अभिनेत्याच्या या वागण्यातून एक गोष्ट नक्की झाली कि हीरोला आपल्या परफॉर्मेंससाठी कॅमेऱ्याची आवश्यकता नसते."
 
हा प्रसंग चित्रपटातील दृष्यापेक्षा कमी थरारक नव्हता, मात्र वास्तवात असे घडले होते आणि तेव्हा शहरामध्ये हा चर्चेचा विषय बनला होता. वर्तमानपत्रात देखील हा मुख्य बातम्यांचा मथळा बनला होता. या पोस्टनंतर, हृतिकचे चाहते याविषयी अधिक जाणण्यासाठी कॉमेंट करत आहेत आणि सोबत त्यांना ऋतिकचा अभिमान असल्याचे देखील नोंदवत आहेत.
 
यानंतर, आणखी एका ट्विटर वापरकर्त्याने या गोष्टीला दुजोरा देत म्हटले की हे खरे आहे आणि असे ही सांगण्यात येऊ लागले की कसे त्या एरियातील सर्व मुलींनी पुढचे काही दिवस त्या मैनहोलमध्ये पडण्याची इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केली कि त्यांनादेखील  ऋतिक रोशन द्वारे वाचवण्यात येईल.
 
ऋतिक रोशन त्यावेळी त्या मुलीला वाचवण्यासाठी तिथे आला, जेव्हा त्याने अभिषेक बच्चनच्या बंगल्याच्या बाहेर तिला पाण्यात घसरताना पाहिले. अभिनेत्याने केवळ तिला त्यातून बाहेर काढले नाही तर तिचे प्राण वाचवले आणि व्यक्तिश: तिला तिच्या होस्टेलमध्ये सोडून देखील आला.
 
आणखी एका ट्विटर वापरकर्त्याने देखील याला दुजोरा देत म्हटले की ती मुलगी, एनएमआईएमएस मध्ये शिकणारी त्याची बैच मेट होती.
 
या सर्व कारणांमुळे, ऋतिक रोशनला त्याच्या प्रतिभेसोबतच, त्याच्या व्यक्तित्वाला देखील चाहते पसंत करतात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमिताभ बच्चनना अश्रू अनावर