Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Career in M.Phil Physics: फिजिक्स मध्ये एम.फिल करून करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, व्याप्ती जाणून घ्या

Career in M.Phil Physics: फिजिक्स मध्ये एम.फिल करून करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, व्याप्ती जाणून घ्या
, गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (08:26 IST)
मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन फिजिक्स 2 वर्षाचा पदव्युत्तर संशोधन स्तरावरील अभ्यासक्रम आहे. उमेदवारांना फिजिक्स मधील एमफिल ही मास्टर्स आणि डॉक्टरेट मधील इंटरमीडिएट पदवी आहे. या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञान-आधारित करिअरसाठी मूलभूत ज्ञान प्रदान करणे आहे. भौतिकशास्त्राच्या अभ्यासामुळे रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, वैद्यकीय विज्ञान, पर्यावरण विज्ञान आणि इतर अनेक शास्त्रे समजण्यास मदत होते.
 
पात्रता निकष -
*  इच्छुक उमेदवाराकडे फिजिक्स संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. 
* फिजिक्स एम.फील मध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराला पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 55% गुण असणे आवश्यक आहे
* राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी 5% गुणांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.
* यासोबतच, उमेदवाराला विद्यापीठाकडूनच किंवा UGC-NET सारख्या राष्ट्रीय परीक्षांद्वारे आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षांमध्ये विद्यापीठाच्या दर्जापर्यंत गुण मिळवावे लागतात. 
 
 प्रवेश प्रक्रिया -
कोणत्याही टॉप युनिव्हर्सिटी मध्ये एम फील फिजिक्स अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना प्रवेश परीक्षेला बसणे आवश्यक आहे. 
प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, वैयक्तिक मुलाखत असते आणि जर उमेदवारांनी त्यात चांगले गुण मिळवल्यावरच त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळू शकते.
 
अर्ज प्रक्रिया -
 * उमेदवारने अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. 
* अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, अर्ज भरा. 
*  अर्ज भरल्यानंतर, फॉर्ममध्ये काही चूक असल्यास योग्यरित्या तपासा, अन्यथा तो नाकारला जाऊ शकतो. 
*  मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा. 
 * अर्ज सबमिट करा. 
* क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन फॉर्मची फी भरा.. 
 
प्रवेश कसे मिळवायचे - 
*  उमेदवारांनी फिजिक्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वोच्च विद्यापीठाचे लक्ष्य ठेवले असेल, तर त्यांच्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे फार महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करावी लागते आणि नोंदणी प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेशपत्र जारी केले जातात. ज्यामध्ये प्रवेश परीक्षेशी संबंधित सर्व माहिती दिली जाते जसे की परीक्षा कधी आणि कुठे होणार आहे, इत्यादी.
 
 फिजिक्स मध्ये  प्रवेश प्रक्रिया UGC NET, UGC CSIR NET, GATE, Slate
 इत्यादी प्रवेश परीक्षेवर अवलंबून असते. पात्र उमेदवारांची पुढील मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते.
प्रवेश परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांनी त्याचा निकाल गुणवत्ता यादीच्या स्वरूपात जाहीर केला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार महाविद्यालये दिली जातात.
* मुलाखत आणि नावनोंदणी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले जाते 
  विद्यार्थ्यांना एकतर ऑनलाइन (स्काईप, गुगल मीट, झूम) किंवा ऑफलाइन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बोलावले जाते.
या दरम्यान, इतर सर्व पात्रता निकष तपासले जातात आणि जर विद्यार्थ्यांनी मुलाखतीत चांगली कामगिरी केली तर त्यांना एम फील. फिजिक्सचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश दिला जातो.
 
अभ्यासक्रम-
रिसर्च मैथेड 
टेक्नीक इन थ्योरिटिकल फिजिक्स 
टेक्नीक इन एक्सपेरिमेंटल फिजिक्स
 एनर्जी
 
शीर्ष महाविद्यालये -
जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली 
 भरथियार विद्यापीठ, कोईम्बतूर
केरळ विद्यापीठ, तिरुवनंतपुरम 
चंदीगड विद्यापीठ, चंदीगड
 कालिकत विद्यापीठ, कालिकत
मुंबई विद्यापीठ, मुंबई
 गोवा विद्यापीठ
 अन्नामालिया विद्यापीठ, चिदंबरम
 क्राइस्ट युनिव्हर्सिटी, बंगलोर 
 NIMS विद्यापीठ, जयपूर
 
 जॉब व्याप्ती  -
कंटेंट डेव्हलपर 
 ट्रेजरी मॅनेजमेंट स्पेशलिस्ट
 क्वालिटी कंट्रोल मॅनेजर 
 स्टेटेशियन
 रेडियोलॉजिस्ट
 रिसर्च हेड
 प्रोफेसर
 
 
Edited By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुटलेल्या पोटाबदद्ल पुरुषांना पडणारे 9 प्रश्न आणि त्यांची उत्तरं