Master of Surgery Obstetrics and Gynaecology : मास्टर ऑफ सर्जरी ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी अभ्यासक्रम हे बाळंतपण आणि गर्भवती महिलांशी संबंधित दोन सर्जिकल वैद्यकीय वैशिष्ट्ये आहेत आणि अशा प्रकारचा एकमेव पोस्ट-पदवी कोर्स आहे. या अभ्यासक्रमात ऑब्स्टेट्रिक्स पेथोलॉजी ,गायनॅकॉलॉजी पॅथॉलॉजी, स्त्रीरोग पॅथॉलॉजी, ऑपरेटिव्ह ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी, मेडिकल सर्जिकल डिसीज, कॉम्पलीकेशन इन ऑब्सटेट्रिक्स गायनॅकॉलॉजी,एबनॉर्मल प्रेग्नेंसी कॉमन डिसऑडर्स अँड सिस्टमेटिक डिजीज एसोसिएटिड विद प्रेगनेंसी, कॉमन ऑब्सटेट्रिक्ल ऑपरेशन, इंफेंट केयर हे विषय येतात.
पात्रता-
मास्टर ऑफ सर्जरी ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी कोर्स हा दोन वर्षांचा कोर्स आहे. भारतातील प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग अभ्यासक्रमात एमएसमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस अभ्यासक्रमात किमान 55% गुण असणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवार प्रवेश परीक्षा देऊन या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.
प्रवेश प्रक्रिया -
प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रातील एमएस प्रवेश प्रक्रिया प्रत्येक महाविद्यालयात वेगळे प्रकारांनी आयोजित केली जाते.
काही महाविद्यालये या अभ्यासक्रमात गुणवत्तेवर आधारित प्रवेश देतात.
तर काही महाविद्यालये राष्ट्रीय स्तरावर NEET-PG किंवा राज्य किंवा स्वत:च्या स्तरावर प्रवेश परीक्षा घेतात
• AIIMS PG: AIIMS MDS, MD, MS सारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा आयोजित करते.
• NEET PG: NBE भारतातील महाविद्यालयांद्वारे ऑफर केलेल्या सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश परीक्षा आयोजित करते.
आवश्यक कागदपत्रे-
• 12वी गुणपत्रिका
• प्रवेश परीक्षेचे गुणपत्रक (लागू असल्यास)
• पदवी प्रमाणपत्र आणि मार्कशीट
• कॉलेज सोडल्याचा दाखला
• मायग्रेशन प्रमाणपत्र
• प्रोव्हिजनल प्रमाणपत्र
• 5 पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो
• जात/जमातीचे प्रमाणपत्र (SC/ST उमेदवारांचे) / साठी शारीरिकदृष्ट्या अपंगत्व प्रमाणपत्र
अभ्यासक्रम सिद्धांत
• बेसिक साइंस रिलेटिड टू ऑब्सटेट्रिक्स एंड गायनेकोलॉजी
• ऑब्सटेट्रिक्स इंक्लूडिंग डिजीज ऑफ नीयोनेट्स
• प्रिन्सिपल आणि प्रॅक्टिस गायनॅकॉलॉजीआणि गायनॅकॉलॉजीकल पॅथॉलॉजी
• रिसेंट एडवांस इन ऑब्सटेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी
• प्रॅक्टिकल
दीर्घ प्रकरण
• लहान प्रकरण
• तोंडी सत्र
नोकरीची शक्यता प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रातील एमएस उमेदवार खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात. त्यांना नर्सिंग होम, हेल्थ क्लब, डिफेन्स सर्व्हिसेस, चाइल्ड केअर युनिट्स, कम्युनिटी हॉस्पिटल्स अशा विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळू शकतात. ते त्यांच्या शिक्षण आणि अनुभवाच्या आधारावर शिक्षक/प्राध्यापक पदासाठी अर्ज करू शकतात.
व्याप्ती -
मास्टर ऑफ सर्जरी ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी कोर्स
पूर्ण केल्यावर, उमेदवार त्यांचे करिअर वाढवण्यासाठी पुढील अभ्यासासाठी देखील जाऊ शकतात.
पीएचडी: नोकरीच्या चांगल्या पर्यायांसाठी, उमेदवार संबंधित प्रवाहात पीएचडी पदवी घेऊ शकतात.
फेलोशिप कोर्स: उमेदवार फेलोशिप प्रोग्रामसाठी देखील जाऊ शकतात जो पोस्ट रेसिडेन्सी प्रोग्राम आहे.
पगार -
प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रातील MS अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर
• प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांचा पगार 3,00,000 ते 12,00,000 प्रति वर्ष
• क्लिनिकल असोसिएट पगार 2,00,000 ते 6,00,000 प्रति वर्ष
• जनरल फिजिशियन पगार 3,00,000 ते 9,00,000 प्रति वर्ष मिळवू शकतात.
शीर्ष महाविद्यालये -
• ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नवी दिल्ली
• कस्तुरबा मेडिकल कॉलेज
• आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज
• मौलाना आझाद मेडिकल कॉलेज