Festival Posters
✕

आंबट-गोड आणि तिखट अशी चटपटीत सफरचंद चटणी रेसिपी

Webdunia
गुरूवार, 26 मार्च 2026 (15:53 IST)
सफरचंदाची चटणी ही चवीला आंबट-गोड आणि तिखट अशी चटपटीत लागते. ही चटणी तुम्ही पराठे, धपाटे किंवा ब्रेडसोबतही खाऊ शकता. 
 
साहित्य-
सफरचंद: २ मध्यम आकाराचे (किसलेले किंवा बारीक चिरलेले)
गूळ किंवा साखर: अर्धी वाटी (सफरचंदाच्या आंबटपणानुसार कमी-जास्त करा)
लाल तिखट: १ छोटा चमचा
जिरे पूड: अर्धा चमचा
चाट मसाला किंवा आमचूर पावडर: अर्धा चमचा
मीठ: चवीनुसार (किंवा थोडे काळं मीठ)
तेल: १ मोठा चमचा
मोहरी व जिरे: फोडणीसाठी
दालचिनीचा छोटा तुकडा: (ऐच्छिक, छान स्वाद येतो)
 
कृती-
सफरचंद तयार करा: सफरचंद स्वच्छ धुवून, त्याची साल काढून घ्या आणि किसणीने किसून घ्या किंवा अगदी बारीक तुकडे करा.
फोडणी: एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि दालचिनीचा तुकडा टाका.
शिजवून घेणे: फोडणीत सफरचंदाचा कीस टाकून २-३ मिनिटे परतून घ्या. त्यावर झाकण ठेवून सफरचंद थोडे मऊ होऊ द्या.
मसाले टाका: सफरचंद मऊ झाले की त्यात गूळ/साखर, लाल तिखट, जिरे पूड, चाट मसाला आणि मीठ टाका.
मिळून येणे: गूळ विरघळल्यावर चटणीला पाणी सुटेल. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि सफरचंद पूर्णपणे शिजून काचेसारखे पारदर्शक दिसेपर्यंत मंद आचेवर शिजवा.
थंड करा: चटणीला छान चकाकी आली की गॅस बंद करा. थंड झाल्यावर ही चटणी अधिक घट्ट होते.  ही चटणी काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवल्यास १०-१५ दिवस छान टिकते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Kiwi Chutney Recipe साधी सोपी चटपटीत किवी चटणी रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: लसणाची चटपटीत चटणी तुमच्या जेवणाची चव अनेक पटींनी वाढवेल; लिहून घ्या रेसिपी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

पारंपरिक सारणाला द्या आधुनिक ट्विस्ट; दिवाळी स्पेशल ''चॉकलेट ड्रायफ्रूट करंजी''

फराळाची रंगत वाढवण्यासाठी दिवाळीत शेवचे हे वेगवेगळे प्रकार नक्की ट्राय करा

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता निवड प्रक्रियेबद्दल जाणून घ्या

सणासुदीत त्वचेवर आणा नैसर्गिक चमक! चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्किन केअर टिप्स

पुढील लेख
Show comments