Festival Posters

राज्यात गुरुवारी ३,८२४ नवीन रुग्णांची नोंद

Webdunia
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (10:19 IST)
राज्यात गुरुवारी ३,८२४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८,६८,१७२ झाली आहे. तुलनेत राज्यातील रुग्णांच्या संख्येत १२८७ रुग्णांची घट झाली आहे. राज्यात ७१,९१० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ७० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, राज्यातील मृतांची संख्या ४७,९७२ वर पोहाचेली आहे. 
 
सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. राज्यात ७० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १३, नवी मुंबई मनपा ३, नाशिक ३, अहमदनगर ३, पुणे ८, सोलापूर ४, सातारा ५, सांगली ४,
जालना ४, लातूर ३, नागपूर ३ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ७० मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
 
गुरुवारी ५,००८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७,४७,१९९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५२ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,१५,०२,४२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,६८,१७२ (१६.२४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४१,०५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,१३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

E20 धोरणासंदर्भातील खोट्या दाव्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून नितीन गडकरींना परवानगी; मेटा आणि गूगलवर कायदेशीर कारवाई होणार

महाराष्ट्रातील ५६ लाख शेतकऱ्यांचे ४८,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाणार; शेलार यांची घोषणा

महाराष्ट्र आरोग्य विभागाने रक्त व्यापारावर कडक कारवाई सुरू केली, अनियमितता आढळल्यास FDA कारवाई करणार

LIVE: अकोल्यात शिंदे सेनेचे नेते मोहसीन शेख यांचे निधन

रब्बी हंगामातील अत्यंत महत्त्वाचे पीक; हरभरा लागवडीची संपूर्ण माहिती

पुढील लेख
Show comments