Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात गुरुवारी 796 नवीन रुग्णांचे निदान

796 new patients diagnosed in the state on Thursday
, शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (08:42 IST)
राज्यातील कोरोना बाधित  रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. गुरुवारी  राज्यातील कोरोनाची आकडेवारी हजाराच्या आत आली आहे. राज्यात बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह  रुग्णांची (active patient) संख्या 7 हजारावर आली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात गुरुवारी  796 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 952 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
 
राज्यात आतापर्यंत 64 लाख 85 लाख 290 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.71 टक्के आहे. तसेच 24 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 049 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
 
सध्या राज्यात 07 हजार 209 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 57 लाख 28 हजार 280 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 37 हजार 221 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 73 हजार 024 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 897 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विदेशी प्रवाशां पैकी सुमारे ५०० जणांच्या तपासण्या, त्यामधून ५ जण कोरोनाबाधित