राज्यात मंगळवारी ९४२ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर ६७८ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ३५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८३,४३५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.७१ टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३५,६५८ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०९९७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,५५,११,३९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,३५,६५८ (१०.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८३,४२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ७,५५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.