Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

या शहरातील नगरसेवकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसच घेतली नाही..!

या शहरातील नगरसेवकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसच घेतली नाही..!
, बुधवार, 1 डिसेंबर 2021 (08:41 IST)
सर्वत्र लसीकरण मोहीम असतांना मालेगाव शहरातील लोकप्रतिनिधीच याबाबत उदासीन असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसऱ्या लाटेनंतर नाशिक जिल्ह्यात लसीकरणाला वेग आला असताना मालेगावातील नगरसेवकच लसीकरण करत नसल्याने नागरिक कसे करतील असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
एकीकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याने जगभरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणा कामाला लागली असतांना दुसऱ्या लाटेत कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात मात्र लोकप्रतिनिधी याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या अत्यल्प लसीकरणामुळे महापालिकेची महासभा ऑनलाईन घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
 
दरम्यान मालेगाव महानगरपालिकेची महासभा ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. मात्र मनपातील अनेक नगरसेवकांनी लस घेतली नसल्याने ऑफलाइन महासभा स्थगित करण्याचा सर्व पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
 
दरम्यान शहरातही लसीकरणाचा टक्का अत्यल्प असून आतापर्यंत पहिला 32 टक्के दुसरा डोस फक्त 11 टक्केच लोकांनी घेतल्याचे महिला पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यातच नगरसेवक लस घेत नसल्याने नागरिकांना कोण प्रोत्साहित करेल असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जोखमीच्या देशातून आलेले सहा प्रवासी करोनाबाधित