Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुकाराम मुंढे झाले कोरोनामुक्त

fight given through
, सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (08:24 IST)
प्रबळ इच्छाशक्ती, शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी कोरोनावर यशस्वीपणे मात केली, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य, सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.
 
मुंडे यांनी म्हटले आहे की, नागपूर महानगरपालिकेच्या सात महिन्यांच्या आयुक्त पदाच्या कार्यकाळातील साडे पाच महिने कोरोना महामारीविरुद्ध यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करण्याचा योग आला. यादरम्यान सर्व प्रोटोकॉल पाळले. मात्र कर्तव्य बजावताना मलाही कोरोनाची लागण झाली. २४ ऑगस्ट रोजी चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
 
शासनाच्या दिशानिर्देशानुसार नियमांचे पालन करत आयसोलेशन पिरियड सुरू झाला. चाचणीचा निकाल आला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीचा आदेश आला. घरीच असल्याने मनात विचारांचे काहूर सुरू झाले. मात्र, कुठल्याही नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. कारण कोरोनाच्या पॉझिटिव्ह चाचणीवर मात करायची असेल तर विचारांची सकारात्मकता आवश्यक आहे.
 
ही सकारात्मकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या शुभेच्छांच्या जोरावर कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य झाले. समाजातील दुष्प्रवृत्ती आणि कुविचारांवर मात करण्यासाठीसुद्धा या गोष्टी आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली दांडगी इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि ध्येयनिश्चितीच्या जोरावर समाजात सकारात्मकता पसरवावी. चला, समाजात सकारात्मकता रुजविण्यासाठी समविचारी आणि प्रबळ इच्छाशक्ती बाळगणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊया, असे आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय म्हणता, रूग्ण वाहिकेची वाट बघून वैतागले म्हणून कोरोना रूग्ण गावात फिरून आले