Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोरोनावरची स्वदेशी लस कोव्हॅक्सिनची मानवी चाचणी सुरु

कोरोनावरची स्वदेशी लस कोव्हॅक्सिनची मानवी चाचणी सुरु
, मंगळवार, 21 जुलै 2020 (08:58 IST)
दिल्लीतील एम्स रुग्णालयात स्वदेशी लस कोव्हॅक्सिनची मानवी चाचणी सोमवार म्हणजेच आजपासून सुरू करण्यात येणार आहे. शनिवारी, दिल्ली एम्सच्या एथिक्स कमिटीने कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या मानवी टप्पा १ चाचणीस मान्यता दिली. तर १० तासात १००० हून अधिक लोकांनी मानवी चाचण्यांसाठी आपले नाव नोंदले आहे. सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये ही चाचणी घेण्यास परवानगी मिळाल्याने इतर १२ केंद्रांनी या लसीसंदर्भात यापूर्वीच चाचण्या सुरू केल्या आहेत.
 
एम्सचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांच्या मते, ०७४२८८४७४९९ या क्रमांकावर कॉल करून कोणीही लसीच्या चाचणीसाठी आपले नाव नोंदवू शकतात. चाचणीसाठी, नावे ctaiims.covid19@gmail.com वर देखील नोंदता येतील.
 
प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी सांगितले की, केवळ १८ वर्षांवरील किंवा ५५ वर्षांखालील लोकांवरच ही चाचणी करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीवर कोरोना लसीची मानवी चाचणी केली जाईल त्याची कोरोना तपासणी देखील केली जाणार आहे. रक्त, यकृत, बीपी आणि मूत्रपिंडासह सर्व चाचण्यांमध्ये निरोगी असतील, अशा व्यक्तींना या लसीचा डोस दिला जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनाची तयारी जोरात सुरु