महाराष्ट्रातल्या करोना बाधितांची संख्या 1135 वर पोहचली आहे तसेच आजपर्यंत 120 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडताना मास्क लावणे गरजेचे असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
तसेच धारावीत रुग्णसंख्या वाढल्यामुळे चितेंत वाढ झाली आहे. तरी इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती नियंत्रणात असून राज्य अद्याप स्टेज 3 मध्ये नाही असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.