Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात २० हजार १३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Webdunia
बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (09:44 IST)
राज्यात मंगळवारी २० हजार १३१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ६,७२,५५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात मंगळवारी २,४३,४४६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३८० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २७,४०७ वर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर २.९ टक्के एवढा आहे.
 
मात्र दिलासादायक म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.२६ % एवढे झाले आहे. मंगळवारी १३,२३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आतापर्यंत एकूण ६,७२,५५६ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 
राज्यात ३८० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४२, ठाणे १०, नवी मुंबई मनपा १, मीरा भाईंदर मनपा 3, रायगड २, पनवेल मनपा १, नाशिक १९, अहमदनगर ९, जळगाव १६, पुणे ५५, पिंपरी चिंचवड मनपा १३, सोलापूर १२, सातारा १६, कोल्हापूर २५, सांगली २८, औरंगाबाद ७, लातूर ४, उस्मानाबाद १, नांदेड ९, नागपूर ५६, अन्य २ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३८० मृत्यूंपैकी २५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
 
उर्वरित ३० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३० मृत्यू पुणे ७, कोल्हापूर ७, औरंगाबाद ४, नाशिक २, सातारा २, ठाणे २, अमरावती १, धुळे १, जळगाव १, नागपूर १, उस्मानाबाद १ आणि रत्नागिरी १ असे आहेत. आज १३,२३४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६,७२,५५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.२६ टक्के एवढे झाले आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४७,८९,६८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९,४३,७७२ (१९.७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५,५७,३०५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,१४१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments