Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 15 May 2025
webdunia

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या पोहोचली अडीच लाखांवर

The number of corona patients
, शुक्रवार, 31 जुलै 2020 (08:51 IST)
राज्यात कोरोनाचे गुरुवारी  ८८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचं एकूण संख्या २ लाख ४८ हजार ६१५ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे. गुरुवारी ११,१४७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४८  हजार १५० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
  
पाठविण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ५४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के एवढा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिशन बिगिन अगेन अंतर्गत नवी नियमावली जारी