Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात सोमवारी २,९४९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

The state recorded 2
, मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (09:10 IST)
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे. राज्यात सोमवारी २,९४९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८,८३,३६५ झाली आहे. राज्यात  एकूण ७२,३८३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४८,२६९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे.
 
राज्यात सोमवारी  ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७, ठाणे ३, नाशिक १२, पुणे ५, अमरावती ६, नागपूर ८ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २५ मृत्यू नशिक ११, अमरावती ६, पुणे ३, परभणी २, नांदेड २ आणि नागपूर १ असे आहेत.
 
 ४,६१० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १७,६१,६१५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१७,४८,३६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,८३,३६५ (१६.०३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०४,४०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,३३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

...तर पुन्हा उपोषणाला बसणार-अण्णा हजारे