Festival Posters

WHO : पुढचे 2 आठवडे धोक्याचे! रोज 1 लाखांहून अधिक रुग्ण वाढणार

Webdunia
मंगळवार, 16 जून 2020 (12:03 IST)
जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर इशारा दिला आहे. आशिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्व देशांमध्ये कोरोनाचं थैमान कायम राहणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
 
मागच्या काही दिवसांमध्ये वेगानं रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. 15 दिवसांमध्ये जवळपास रोज 1 लाखहून अधिक नवीन रुग्णांना लागण झाल्याचं समोर येत आहे. पुढचे दोन आठवडे अशीच स्थिती कायम राहिल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)दिला आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरॉस एडहोम यांच्या म्हणण्यानुसार 50 दिवसांनंतर पुन्हा एकदा चीनमध्ये बिकट स्थिती निर्माण झाली आहे. बीजिंगमध्ये 90 हजार लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. चीन सध्या हे प्रकरण सध्या चांगल्या पद्धतीनं हाताळलं जाईल असा जागतिक आरोग्य संघटनेला विश्वास आहे. चीनला काही मदत लागल्यास जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक तिथे जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
 
आफ्रिकेमध्येही कोरोनाचा संसर्ग (coronavirus)वेगानं पसरत असल्याचंही सांगितलं आहे. येत्या दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होईल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. 
 
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात जास्त वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात आहे. आजही 10 हजार 667 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 380 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 3 लाख 43 हजार 91वर पोहचला आहे. 
 
मात्र दिलासादायक बाब म्हणजे देशात सध्या 1 लाख 53 हजार 178 सक्रीय रुग्ण असले तरी निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 80 हजार 013 रुग्ण निरोगी झाले आहे. तर, एकूण मृतांची संख्या 9 हजार 900 आहे. दुसरीकडे अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर आता भारताचा सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत चौथा क्रमांक लागतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

LIVE: आमच्या प्रत्येक खासदाराला १५ कोटींचे ऑफर', शिवसेना यूबीटीचे संजय राऊत यांचा मोठा दावा

EV स्कूटरची बॅटरी किती वर्षे टिकते? बदलण्याचा खर्च किती येतो?

ऑनर 10,000mAh बॅटरी आणि 10,000 nits ब्राइटनेस असलेल्या एका स्वस्त स्मार्टफोनसह धुमाकूळ घालणार

'महाराष्ट्रात दुष्काळ पडणार नाही, यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगले', पंजाबराव डखांचा मोठा अंदाज

मेलडी मोमेंट'नंतर, पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलानी पुन्हा एकत्र आले, त्यांनी ट्रम्प यांच्याशी हस्तांदोलन केले

पुढील लेख