Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

‘रुग्णालयात बेड देऊ शकत नाही तर इंजेक्शन देऊन वडिलांना मारून तरी टाका’

‘रुग्णालयात बेड देऊ शकत नाही तर इंजेक्शन देऊन वडिलांना मारून तरी टाका’
, गुरूवार, 15 एप्रिल 2021 (21:10 IST)
राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या काही केल्या आटोक्यात येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड मिळत नाही. असाच प्रकार चंद्रपूर येथेही घडला. एका कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात बेड मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या त्याच्या मुलाने वडिलांना इंजेक्शन देऊन मारून टाका, असे म्हटले आहे.
 
महाराष्ट्रातील चंद्रपूरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. एक मुलगा त्याच्या वडिलांना रुग्णवाहिकेतून घेऊन रुग्णालयात पोहोचला. रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन हळूहळू संपत आहे. मात्र, तरीही रुग्णालयात बेड मिळत नाही. जेव्हा त्याला पत्रकारांनी विचारले असता त्याने सांगितले, की ‘बेड मिळत नाही आणि ऑक्सिजनही संपत आहे. जर माझ्या वडिलांना इथे बेड मिळू शकत नाही तर किमान त्यांना इंजेक्शन देऊन मारून तरी टाका. मी त्यांना घरी नेणार नाही. वडिलांना श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिकेतच ठेवण्यात आले. रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनही संपत आहे. त्यामुळे वडिलांना श्वास घेता यावा म्हणून आम्ही ऑक्सिजन सिलेंडर उलटा केला आहे’.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांकडे मागितली मदत लिहिले पत्र; कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा