Palestine Flag at Eden Gardens : एकदिवसीय विश्वचषकाचा 31 वा सामना बांगलादेश आणि पाकिस्तान (PAKvsBAN) यांच्यात खेळला गेला, दोन्ही संघांनी या स्पर्धेत चांगली कामगिरी दाखवली नाही. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये खेळला गेला, या सामन्यादरम्यान इस्रायल-हमास युद्धाच्या निषेधार्थ 4 लोक पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवत होते.
पाकिस्तान-बांगलादेश सामन्यादरम्यान पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवल्याप्रकरणी कोलकाताने या 4 जणांना ताब्यात घेतले आहे. स्टेडियमच्या G1 आणि H1 ब्लॉक्समधील सामन्याच्या पहिल्या डावात बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना ही घटना घडली. पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावत या लोकांचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झटपट व्हायरल झाला.
Why are @BCCI not banning the entry of such controversial Palestine flag in Kolkata's Eden Garden Stadium?
If the Palestinian flag is allowed in the Eden Garden, we will carry the Israeli flag. pic.twitter.com/5fm4j2Yqh5