ICC ODI World Cup 2023 SA vs SL: विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात श्रीलंकेचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत होता. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना झाला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा आहे, तर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका आहे. विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने पाच सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने एक सामना जिंकला आहे. एक सामना बरोबरीत आहे.
विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा १०२ धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 5 गडी गमावून 428 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 100 धावा, रॅसी व्हॅन डर डुसेनने 108 धावा आणि एडन मार्करामने 106 धावा केल्या.
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 44.5 षटकांत 326 धावांवर गारद झाला. कुसल मेंडिसने 76 धावा, चरित असलंकाने 79 धावा आणि कर्णधार दासुन शनाकाने 68 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झीने तीन बळी घेतले. अशाप्रकारे 102 धावांनी विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने 2023 च्या विश्वचषक मोहिमेला विजयाने सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला .नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली.