Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्ल्ड कप : पाकिस्तानची सुरुवातीलाच दाणादाण. बाबर आझम, फखर झमान स्वस्तात आउट

Pak vs Nedarland
, शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (15:13 IST)
मोठी धावसंख्या उभारण्याच्या निर्धारानं मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरूवात खराब झाली.
फखर झमान 12 धावा काढून बाद झाला. गेल्या काही महिन्यांपासून मोठी धावसंख्या उभारण्यासाठी संघर्ष करणाऱ्या फखरचा खराब फॉर्म विश्वचषकातील पहिल्या सामन्यातही कायम आहे.
 
पाकिस्तानची खराब सुरुवात
त्यानंतर कॉलिन एकरमॅननं पाकिस्तानला मोठा धक्का दिला. त्यानं बाबर आझमला फक्त 5 धावांवर बाद केलं. बाबरकडून मोठ्या खेळीची सर्वांनाच अपेक्षा होती, पण त्याला पहिल्या सामन्यात तरी अपयश आलंय.
 
बाबर आझम बाद झाल्यानंतर पाकिस्तानवरील दडपण पॉल व्हॅन मीकरेननं आणखी वाढवलं. त्यानं इमाम उल हकला 15 धावांवर बाद करत नेदरलँड्सला तिसरं यश मिळवून दिलं. दहा ओव्हर्सच्या पहिल्या पॉवर प्लेवर नेदरलँड्सनंच वर्चस्व गाजवलं.
 
वर्ल्डकपचा दुसरा सामना आज (6 ऑक्टोबर) होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात नेदरलँड्सचा कॅप्टन स्कॉट एडवर्ड्सनं टॉस जिंकून पहिल्या गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
वन-डे विश्वचषकात भारतीय भूमीवरील पहिला विजय मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल. यापूर्वी भारतात खेळलेल्या या स्पर्धेतील 2 सामन्यात त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं.
 
नेदरलँड्सचा संघ 2011 नंतर पहिल्यांदाच वन-डे विश्वचषक खेळत आहे. या विश्वचषकासाठी झालेल्या पात्रता फेरीत त्यांनी वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांना मागं टाकत अंतिम स्पर्धेसाठी जागा मिळवलीय.
 
असे आहेत दोन्ही संघ
पाकिस्तान : इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), सौद शकील, इफ्तिकार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्म वसीम ज्यूनिअर, शाहिन आफ्रिदी, हॅरिस रौफ
 
नेदरलँड्स : विक्रमजीत सिंह, मॅक्स ओ’डॉड, वेस्ले बेरसी, बास दी लीडे, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स, (कर्णधार आणि विकेटकिपर), लोगान वॅन बीक, साकिब झुल्फिकार, रुलाफ व्हॅन डर मर्व, पॉल व्हॅन मीरीकेन, आर्यन दत्त
 
काय आहे दोन्ही संघांची परिस्थिती?
एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची लोकप्रियता कमी होत असताना नेदरलँड्सचा संघ मात्र 2023 च्या वर्ल्डकपसाठी पात्र ठरलाय.
 
पात्रता स्पर्धेत तब्बल सात प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही चांगला खेळ करून हा संघ वर्ल्डकप साठी भारतात आलाय. मात्र दुर्दैवाने पावसामुळे त्यांना एकही सराव सामना खेळता आलेला नाही.
 
कर्नाटकच्या रणजी संघविरुद्ध खेळलेल्या दोन सामान्यांना सोडून अलीकडच्या काळात दर्जेदार क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे नाहीये.
कोण काय म्हणालं?
पाकिस्तान संघातील फिरकी गोलंदाजांबाबत बोलताना मिकी आर्थर म्हणाले की, "आमच्या खेळाडूंकडे अप्रतिम कौशल्य आहे त्यामुळं त्याबाबत आम्हाला कसलीही चिंता नाही. त्यामुळे मानसिक आणि तांत्रिक पातळीवर त्यांना तयार ठेवणं गरजेचं आहे, तसं झाल्यास आम्ही उत्तम खेळ करू."
 
नेदरलँड्सचा खेळाडू बास द लीडे म्हणाला की, "आम्हाला काहीही करून सेमिफायनल गाठायची आहे. त्यासाठी चार ते पाच विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे काही प्रमुख संघांचा पराभव करणं आमच्यासाठी गरजेचं आहे."
 
 










Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sky Bus will start in India भारतात सुरु होणार स्काय बस