Festival Posters

Diwali Special : चिरोटे (पाकातील)

Webdunia
साहित्य : रवा, मैदा, साखर, तूप, आंबट दही, केशर किंवा खाण्याचा केशरी रंग.

कृती : रवा व मैदा समप्रमाणात घ्यावा. त्यात चवीला मीठ व तेल किंवा तुपाचे मोहन घालून रवा व मैदा आंबट दह्यात भिजवावा. पिठाच्या दीडपट साखर घेऊन त्याचा दोन तारी पाक करावा व त्यात केशर किंवा खाण्याचा केशरी रंग घालावा व आवडत असल्यास लिंबू पिळावे. भिजविलेला रवा-मैदा कुटून त्याच्या किंचित जाडसर पोळ्या लाटाव्यात. त्यानंतर एका पोळीला तूप लावून, त्यावर दुसरी पोळी पसरावी व त्यालाही तूप लावावे. नंतर या जोडपोळीची साधारण एक इंच रुंदीची एकावर एक अशी घडी घालून, त्या संपूर्ण घडीचे एक इंच रुंदीचे चौकोनी तुकडे पाडावेत व ते तुकडे, पाहिजे असेल, त्याप्रमाणे चौकोनी किंवा लांबट लाटून, तुपात तळावेत व साखरेच्या पाकात सोडावेत. नंतर बाहेर काढून उभे करून ठेवावेत. पाक गरमच असावा. या प्रमाणेच सर्व पोळ्यांचे चिरोटे करावे त.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Mawa Kachori शाही मिठाईंमध्ये सर्वात प्रसिद्ध मावा कचोरी; घरीच बनवण्याची सोपी पद्धत लिहून घ्या

निरोगी जीवनासाठी अवलंबवा या 10 सोप्या आणि प्रभावी टिप्स

कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनिअर मध्ये कॅरिअर करा

डोळ्यांखाली काळे वर्तुळांसाठी मधाचा वापर करा

रंगपंचमी विशेष थंडाईचे लोकप्रिय असलेले पारंपारिक ३ हटके प्रकार

पुढील लेख
Show comments