Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

"नवरात्रीच्या उपवासासाठी साखरपाकाची खीर नको? बनवा मखान्याची स्वादिष्ट आणि पौष्टिक खीर''

makhana kheer
नवरात्रीच्या उपवासासाठी साखरपाकाची किंवा नेहमीची खीर नको असेल, तर पौष्टिक आणि स्वादिष्ट मखान्याची खीर हा एक उत्तम पर्याय आहे. मखाना पचायला हलका असतो आणि उपवासाच्या दिवशी शरीराला झटपट ऊर्जा देतो. ही खीर कशी बनवायची, त्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.....

साहित्य-
मखाने: २ वाट्या
दूध: १ लिटर (फुल क्रीम)
साखर: ४ ते ५ चमचे (किंवा तुमच्या आवडीनुसार)
तूप: २ चमचे
वेलची पूड: १/२ चमचा
ड्रायफूट्स: बदाम, काजू आणि पिस्त्याचे तुकडे (२-३ चमचे)
केशर: ८-१० काड्या (२ चमचे कोमट दुधात भिजवलेल्या)
ALSO READ: कमी तेलात बनवा कुरकुरीत उपवासाचे कटलेट; नवरात्रीत संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय
कृती-
मखाने भाजणे: एका कढईत १ चमचा तूप गरम करा. त्यात मखाने घालून मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
मखाने बारीक करणे: भाजलेले मखाने थंड झाल्यावर त्यातील पाऊण वाटी (३/४) मखाने मिक्सरमध्ये हलकेच जाडसर भरडून घ्या आणि उरलेले १/४ मखाने तसेच अख्खे बाजूला ठेवा.
दूध आटवणे: एका मोठ्या भांड्यात किंवा कढईत १ लिटर दूध गरम करायला ठेवा. दुधाला उकळी आल्यावर आच मंद करा आणि दूध थोडे घट्ट होईपर्यंत (सुमारे ७-८ मिनिटे) उकळू द्या.
मखाने आणि ड्रायफूट्स घालणे: आता उकळत्या दुधात बारीक केलेले आणि अख्खे मखाने टाका. मंद आचेवर दूध सतत ढवळत राहा, जेणेकरून मखाने दुधात मऊ होतील आणि खीर घट्ट होऊ लागेल. ड्रायफूट्स आणि केशर: दुसऱ्या एका लहान पॅनमध्ये १ चमचा तूप गरम करून काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे हलके सोनेरी परता आणि हे ड्रायफूट्स खिरीमध्ये घाला. सोबतच केशर घातलेले दूधही टाका.
साखर आणि वेलची पूड: खीर छान घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड घाला. साखर पूर्ण विरघळेपर्यंत २ ते ३ मिनिटे शिजवून गॅस बंद करा.
गरमागरम किंवा फ्रिजमध्ये थंड करून, नवरात्रीच्या उपवासाला ही चविष्ट आणि आरोग्यदायी मखाना खीर सर्व्ह करा!
ALSO READ: नवरात्रीच्या उपवासासाठी राजगिरा लाडू घरीच कसे बनवायचे? पाक न करता सोपी पद्धत
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: नवरात्री स्पेशल फराळ थाळी: एकाच वेळी बनवा ४ चविष्ट उपवासाचे पदार्थ

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

"झणझणीत आणि पौष्टिक मोड आलेल्या ''मटकीची उसळ'' रेसिपी